CORONAVIRUS : उमरग्यात आणखी नऊ रुग्णांची वाढ, तर एकाचा मृत्यू 

corona.jpg
corona.jpg

उस्मानाबाद : उमरगा येथील उपजिल्हा रूग्णालयात गुरूवारी (ता. दोन) सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील एकोंडी (जहागिर) येथील एका ५२ वर्षीय नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना मृत्यूची संख्या १३ वर पोहचली आहे. तर आणखी नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील पॉझीटिव्हची संख्या २६४ झाली असून त्यातील १८४ जणांना रुग्णालयातून डिस्जार्ज दिला आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ६८ वर गेली आहे.  

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

 
मृत्यू झालेले व्यक्ती ही गूरुवारी सकाळी पुणे येथून गावाकडे आली होती. उपचारासाठी नेण्यात आल्यानंतर अर्ध्या तासात त्याचा मृत्यू झाला. दरम्यान रूग्णालय प्रशासनाने त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेतला होता. तोपर्यंत मृतदेह शितगृहात ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असुन शनिवारी एका मयतासह नऊ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. उमरगा तालुक्यातील शहरातील एक, एकोंडी एक व गुंजोटी येथील हे तीन रुग्ण आहेत. 

परंडा तालुक्यातील नालगावचे सहा रुग्ण पॉझीटिव्ह आल्याने त्या भागातही आता भितीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसुन येत आहे. दरम्यान उमरग्यातील स्थिती भयावह असताना गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास एकोंडी (जहागिर) येथील एका ५२ वर्षीय व्यक्ती गंभीर अवस्थेत दाखल झाली होती. मयत व्यक्ती हा पुण्यात कामानिमित्त राहतो.

लॉकडाऊन सुरु झाल्यानंतर तो गावाकडे आला होता. कारहुन्नवी सणानंतर तो परत पुणे येथे गेला होता. तेथे तो आजाराने त्रस्त होता, त्याचा मृत्यूचे नेमके कारण अहवालानंतर कळणार होते, अखेर आज त्यांचा अहवाल पॉझीटिव्ह आल्याने कोरोनाने जिल्ह्यात आणखी एकाचा बळी गेल्याचे समोर आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com