सकल धनगर समाजातर्फे अंबड तहसीलमध्ये 'ढोल बजाओ' आंदोलन

बाबासाहेब गोंटे 
Friday, 25 September 2020

सरकार झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी अंबड तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाओ सरकार जगाओ करण्यात आले.

अंबड (जि.जालना) :  सकल धनगर समाजाच्या वतीने अंबड शहरात शुक्रवारी (ता.२५) धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात गंभीर दिसत नाही. सरकार झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी अंबड तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाओ सरकार जगाओ करण्यात आले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

धनगर समाजाला लवकरात लवकर एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, धनगर समाजाची एस. टी. प्रवर्गासाठी न्यायालयात चालू असलेल्या याचिकेला सरकारच्या वतीने वकिलाची नेमणूक करावी, याचिका जलद कोर्टात चालवावी, सरकारने जे आदिवासींना ते धनगर समाजाला या तत्त्वावर दिलेले एक हजार कोटीचे पॅकेज त्वरित द्यावे. यासह आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंबडचे तहसीलदार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी सकल धनगर समाजाचे बाळासाहेब तायडे, भीमराव शिंगाडे, बळीराम खटके, रामभाऊ लांडे, गणेश खरात, संतोष खरात, जय खरात, गणेश शिंगाडे, सचिन खरात, संजय बेवले, पंकज पांढरे, अजय भोजने, शिवाजी लांडे,शरद तायडे, भागचंद खरात, बाबू लांडे, संदीप खरात, गणेश जाधव, संजय खरात, प्रकाश खरात, अनिल भालेकर, राजेंद्र दिवटे आदींची उपस्थिती होती. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhangar Samaj Dhol Bajao movement Ambad news