कोरोनाशी लढा : आरोग्य विभागाने आतापर्यंत खर्च केले सव्वाकोटी 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त झालेल्या ११ कोटींहून अधिक निधीसह खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार नमिता मुंदडा व आमदार विनायक मेटे यांनी खास कोरोनाच्या सामग्रीसाठी दिलेल्या निधीतून हा खर्च करण्यात येणार आहे. 

बीड - महसूल, ग्रामविकास व आरोग्य विभागाकडून कोरोनावरील उपाययोजना प्रभावी होत आहेत. दरम्यान, कोरोना संशयित, क्वारंटाइन आणि भविष्यात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यानंतर लागणाऱ्या सामग्री व इतर उपाययोजनांचीही जोरदार तयारी आरोग्य विभागात सुरू आहे. 

जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त झालेल्या ११ कोटींहून अधिक निधीसह खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार नमिता मुंदडा व आमदार विनायक मेटे यांनी खास कोरोनाच्या सामग्रीसाठी दिलेल्या निधीतून हा खर्च करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्हा वार्षिक योजनेतून प्राप्त झालेल्या निधीतून आतापर्यंत सव्वाकोटींवर रक्कम खर्च झाली असून आता पाच कोटी रुपयांच्या यंत्रसामग्रीच्या खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. 

हेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार

कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यानंतर सुरवातीला डॉक्टर्स, नर्स व इतर कर्मचाऱ्यांना एन- ९५ मास्क, पीपीई किट, सॅनिटायझरच्या मागणीने जोर धरला. त्यानंतर खासदार डॉ. प्रीतम मुंडे, आमदार नमिता मुंदडा व आमदार विनायक मेटे यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून निधी उपलब्ध करून दिला; तसेच अलगीकरण कक्ष, विलगीकरण कक्षांची उभारणी व त्यासाठी लागणाऱ्या उपकरणांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ११ कोटींवर निधी आरोग्य विभागाला प्राप्त झाला आहे. 

हेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय... 

सव्वा कोटी खर्च; पाच कोटींच्या खरेदीची प्रक्रीया 
उपलब्ध झालेल्या निधीतून आतापर्यंत ६०० पीपीई किट (पर्सनल प्रोटेक्शन इक्युपमेंट), सहाशे एन- ९५ मास्क; तसेच अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन पाइपलाइनसह पार्टीशनचे बांधकाम व जिल्हा रुग्णालयातील पार्टीशनचे बांधकाम व ऑक्सिजन पाइपलाइन अशा कामांसाठी सव्वाकोटी रुपयांवर खर्च झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली. आता १० हजार एन- ९५ मास्क व १० हजार पीपीई किटसह २० व्हेंटिलेटर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी पाच कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित असल्याचे डॉ. थोरात म्हणाले. 

हेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस

हेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...

हेही वाचा - युकेचे पंतप्रधान  रुग्णालयात, जनता घरात बसून...

हेही वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण हे क्षेत्र तारणार...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Fighting Corona: The health department has spent the most money so far