Russia Ukraine War| सुरक्षित पोहोचलो पण.. युक्रेनमधून परतलेल्या ऋतुजाची खंत

नुकतेच अडीच महिन्यांपूर्वी मी युक्रेनला पोहोचले. आत्ता कुठेतरी माझी घडी बसत असतांना युद्ध सुरू झाले.
Indian Student Returned From Ukraine
Indian Student Returned From Ukraine esakal

औसा (जि.लातूर) : परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेणे ही माझ्या आणि माझ्या पालकांच्या स्वप्नांना उभारी देणारी गोष्ट होती. नुकतेच अडीच महिन्यांपूर्वी मी युक्रेनला पोहोचले. आत्ता कुठेतरी माझी घडी बसत असतांना युद्ध सुरू झाले आणि माझ्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांना ब्रेक लागला. युक्रेन सोडताना एकीकडे भारतात (Indian Student In Ukraine) सुरक्षित पोहोचण्याची घाई होती तर दुसरीकडे आता पुढील शिक्षणाचे काय? हा प्रश्नही सतावत होता. युद्ध कधी संपेल? युद्धानंतरची परिस्थिती कशी असेल? हे सांगता येत नसल्याने जीव टांगणीला लागला आहे. आमच्या होत असलेल्या शैक्षणिक नुकसानीची भारत सरकार आणि युक्रेन (Ukraine) सरकारने दखल घेऊन काहीतरी मार्ग काढावा. माझ्यासारखी अनेक मुले आज रोमानिया सीमेवर अडकले आहेत. (Ganga Operation Latur Student Returned From Ukraine)

Indian Student Returned From Ukraine
रशिया-युक्रेन युद्धाचे पोलाद उद्योगावर संकट

भारतातला शेवटचा विद्यार्थी जो पर्यंत त्याच्या घरी सुरक्षित पोहोचत नाही तो पर्यंत मनाला समाधान मिळणार नाही." अशी प्रतिक्रिया औसा शहरातील ऋतुजा सोमनाथ देशमाने हिने सकाळशी बोलतांना व्यक्त केली. ती नुकतीच रविवारी (ता.२७) युक्रेनवरून घरी परतली आहे. डिसेंबर महिन्यात ऋतुजा युक्रेनच्या बकोव्हीनिया विद्यापीठात एमबीबीएस प्रथम वर्षात शिक्षण घेण्यासाठी चरणवस्ती शहरात दाखल झाली. वातावरणाशी मिळते जुळते घेईपर्यंत युद्ध पेटले. ती म्हणते "युद्धाचे ठिकाण आम्ही राहत असलेल्या ठिकाणाहून लांब होते. मात्र आम्हाला सांगण्यात आले की लवकर पॅकअप करा. महाविद्यालय व्यवस्थापनाने आम्हाला खूप सहकार्य केले. आम्हाला लागणारी साधन सामग्री व पैसे आम्ही काढून घेतले. त्यामुळे त्या गोष्टींची अडचण आली नाही. घरातील लोक चिंतेत होते. त्यांचा सारखा संपर्क सुरूच होता. किव्हचे विमानतळ बंद करण्यात आल्याने आम्हाला रोमानिया सीमेवर जाण्यासाठी महाविद्यालयाचे अधिष्ठाता स्वतः आमच्या बरोबर होते. रोमानिया सीमेवरून विमानतळ आणि तेथून भारत असा प्रवास करतांना मनात अनेक अनेक विचारांचे वादळ उठत होते. युद्धाच्या बातम्या आणि आम्हाला दिल्या जाणाऱ्या सूचना मनात धडकी भरवणाऱ्या होत्या. (Operation Ganga)

Indian Student Returned From Ukraine
Aurangabad|आईचा आधार हिरावला, पाण्यात बुडून एकुलत्या एक मुलाचा अवेळी मृत्यू

सुरक्षित घरी पोहोचण्या बरोबर मागे अडकलेले भारतीय आणि शिक्षणाचा होत असलेला खेळखंडोबा स्वस्थ बसू देत नव्हता. अकरा मार्चपासून ऑनलाईन शिक्षणाचा महाविद्यालयाचा विचार असला तरी परिस्थिती काय राहील हे सांगता येत नाही. आम्हाला महाविद्यालय, युक्रेन प्रशासन आणि भारत सरकारने खूप चांगली मदत केली. आता त्याच पद्धतीने आमच्या शिक्षणाचा विचार करावा. काही गैरसोय झालीही असेल तर ती या आणीबाणीच्या काळात जास्त विचार करायला लावणारी नव्हती. घरी आल्यावर कुटुंबातील लोकांना पाहून खूप आनंद झाला. मात्र शिक्षण अधांतरी राहिले याची हुरहूर मनात अजूनही कायम आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com