जालन्यातील गझल नि:शब्द..! गझल नवाज शम्स जालनवी यांचे निधन.

सुहास सदाव्रते 
Tuesday, 21 July 2020

'मेरा मन कितना पागल है, अशी गझल पेश करीत, वो मेरी बूढी मॉ से मेरा बचपन मॉंग रहा है.'.. अशा गझलेने दिल्लीतही आपल्या शायरीची अमीट छाप उमटविणारे गझलकार शम्स जालनवी यांचे मंगळवारी ( ता.२१ )  निधन झाले. उर्दू, हिंदी सह मराठी साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

जालना : 'मेरा मन कितना पागल है, अशी गझल पेश करीत, वो मेरी बूढी मॉ से मेरा बचपन मॉंग रहा है.'.. अशा गझलेने दिल्लीतही आपल्या शायरीची अमीट छाप उमटविणारे गझलकार शम्स जालनवी यांचे मंगळवारी ( ता.२१ ) सकाळी साडेसहाच्या सुमारास निधन झाले. उर्दू, हिंदी सह मराठी साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

देशभरातील शेकडो मुशायरातून सात दशके शायरीने मोहीत करणारे शायर शम्सोद्दीन तथा शम्स जालनवी यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. वयाच्या ९७ वर्षापर्यंत दररोज सायकलवर शहरात फिरत वर्तमानपत्र वाटप करीत असत. एकेकाळी एका बिडी कंपनीचे मालक असलेले शम्स जालनवी नंतर शायरीकडे वळले आणि आयुष्याभर गझल जपली. आपल्या गोड गळ्यातून गझल उतरवित रसिकांच्या मनाचा ठाव कधी घेतला जात हे न उलगडणारे कोडे होते. देशभरातील शहरामध्ये मुशायरा असेल तिथे शम्स साहेबांची गझल सादर झाली. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 
'मध्यान्ह का सूर्य' या गझल संग्रहातून शम्स यांनी आपले जीवनानुभव शब्दातीत मांडले. गझल मुशायरा असो की भाषिक कविसंमेलन यात 'मेरा मन कितना पागल है, ही गझल सादर झाली नाही, असे झालेच नाही..'सूखे पेड से छाया मॉंगे पत्थर दिलसे माया मॉंगे अशी गझल आता निशब्द झाली आहे. जीवनाच्या अखेरच्या क्षणातही शम्स जालनवी यांनी गझल जपली. गझलेच्या क्षेत्रातील एक दीपस्तंभ काळाच्या पडद्याआड गेला असल्याचे कवी कैलास भाले यांनी सांगितले आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

शम्स जालनवी यांच्या निधनाने साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. देशभरातील मुशायरातून शम्स साहेबांनी गझल पेश केली. एक गझल नि:शब्द झाली आहे. 
सुहास पोतदार, कवी,गझलकार 

(संपादन : प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ghazal Nawaz Shams Jalanvi passes away