मराठवाड्यात महाविकास आघाडीचाच पदवीधर आमदार : चौगुले   

अविनाश काळे
Saturday, 14 November 2020

सतीश चव्हाण यांना उमरगा-लोहारा मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देणार असल्याचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी उमरगा येथील सहविचार सभेत सांगीतले. 

उमरगा (उस्मानाबाद) : शिक्षण क्षेत्रात पदवीधरांसाठी दोन टर्म आमदार असलेले सतीश चव्हाण यांनी भरीव कार्य केले आहे. आपला हक्काचा माणूस म्हणून प्रत्येक जण त्यांच्याकडे जातो. आपल्या हक्काच्या माणसाला आपले प्रश्न सोडविण्यासाठी आणि विधानपरिषदेत मराठवाड्याचे नेतृत्व करण्यासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्याची पदवीधरांची जबाबदारी आहे. उमरगा-लोहारा मतदारसंघातून त्यांना सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी सामुहिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही शिवसेनेचे उमरगा-लोहारा मतदार संघाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

उमरगा शहरातील येथील शांताई मंगल कार्यालयात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना व मित्र पक्ष महाविकास आघाडी, मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ आयोजित सहविचार सभेत आमदार चौगुले बोलत होते.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

यावेळी प्रास्ताविका बोलताना प्रा. डॉ. शौकत पटेल म्हणाले की, सतीश चव्हाण यांनी केलेल्या कामाची दखल केवळ मराठवाडा नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्राने घेतली आहे. पदविधारांच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी विधानपरिषदेत प्रश्न मांडून त्यांनी शासनाला महत्वपूर्ण निर्णय घेण्यास भाग पाडले आहे. बारा वर्षातील कामगिरी हीच त्यांची हॅट्रिक साधणारी असेल असा विश्वास श्री. पटेल यांनी व्यक्त केला. या वेळी श्री. चव्हाण म्हणाले की, पदवीधरांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी गेली बारा वर्ष प्रयत्न केले. या शिवाय मराठवाड्यातील शैक्षणिक अडचणी असोत की शेतकऱ्यांचे प्रश्न असोत यासाठी सभागृहात लक्ष वेधले. या निवडणूकीत महाविकास आघाडीचे बळ फायदेशीर ठरेल. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

विविध क्षेत्रातील पदवीधरांच्या समस्या असोत कि त्यांना उद्योग क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे श्री. चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र शिंदे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश चव्हाण, शिवसेनेचे युवानेते किरण गायकवाड, शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबुराव शहापुरे, नगराध्यक्षा प्रेमलता टोपले, प्रा. सतीश इंगळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष राजोळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय पवार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप भालेराव, रमेश शिंदे यांच्यासह पदवीधर, शिक्षक, प्राध्यापकांची यावेळी उपस्थिती होती.

(Edited By pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Graduate MLA of Mahavikas Aghadi in Marathwada Chowgule