अंबडच्या मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणावर हातोडा, काही काळ तणाव  

  बाबासाहेब गोंटे 
Thursday, 22 October 2020

नगरपालिकेची धडक कारवाई, वर्षानुवर्ष अतिक्रमणधारकांनी मांडले होते ठाण. 

अंबड (जालना) : अंबड शहरातील बसस्थानक ते कोर्टरोडवर गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही बाजूने अतिक्रमणाने विळखा घातला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्याचा श्वास रोखला गेला असून अतिक्रमण हटवा अशी मागणी केली जात होती. अरुंद रस्ता, वाहन पार्किंगची असलेली गैरसोय आदी कारणांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. गुरुवारी अखेर अबंड नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमणावर हातोडा घालण्यात आला असून शहराच्या मुख्यरस्त्याने अनेक वर्षांनंतर मोकळा श्वास घेतला आहे.  

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

वाहतूकीची व वाहन पार्किंगची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत चालली होती. अखेर पालिकेने बुधवारी (ता.22) दुपारी जेसीबी मशिन घेऊन पालिका, महसूलचे अधिकारी, कर्मचारी तसेच पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यास सुरूवात झाली. पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून तहसिलदार विद्याचरण कडवकर यांनी पदभार स्वीकारला. तोच त्यांनी शहरातील मुख्य रस्त्यावरील तसेच शहरातील विविध भागात नागरिकांनी स्वतःच्या फायद्यासाठी केलेले अतिक्रमण हटविण्याचे काम हाती घेतले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बसस्थान ते वडगावकर हॉस्पिटल पर्यत सिमेंट रस्त्याचे काम सुरू आहे. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण झाल्याने दुकानाच्या पायऱ्या तोडण्यात आल्या आहे. पालिकेचे अभियंता जोशी यांनी रस्त्याचे मोजमाप करून झालेले अतिक्रमण हटविण्यात येत आहे. शहरातील हा सर्वात महत्वाचा रस्ता आहे. यामुळे वाहतुकीची वर्दळ दिवस रात्र सुरू आहे. त्यातच वाहन पार्किंची होत असलेली कोंडी, पादचारी तसेच शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी, दिव्यांग या सर्वांचा विचार करून अतिक्रमण हटविणे महत्वाचे असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महिनाभरापूर्वी दिल्या नोटीसा 

बसस्थानक ते कोर्ट रस्त्यावरील वडगावकर हॉस्पिटलपर्यंत सिमेंट रस्ता बनविण्याचे काम हाती घेण्यात आला. तत्पुर्वी नगरपालिकेच्या अधिकार्यांनी या मार्गावरील अतिक्रमण केलेल्या धारकांना तुमचे अतिक्रमण काढून घ्या, अशी नोटीस बजाबली आहे. तरीदेखील संबंधितांनी आपले अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे नगरपालिकेने अखेर गुरुवारी हातोडा मारला. 

तणाव आणि शांतता 

वर्षानुवर्ष अतिक्रमण करुन ठाण मांडलेल्या काही अतिक्रमणधारकांनी या कारवाईला विरोध दर्शविला. असे अचानक आमचे नुकसान कसे करु शकता, आम्हाला वेळ द्या, असे काही व्यापारी व नागरिकांनी पवित्रा घेतला. मात्र, महिन्याभरापुर्वीच नोटीसा देऊन सूचित करण्यात आले होते. आता आम्ही काहीही करु शकत नाही, असे अतिक्रमण अधिकार्यांनी नागरिकांना सांगीतले. 

(संपादन-प्रताप अवचार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hammer on encroachment Ambad news