उस्मानाबाद शहराला पावसाने झोडपले;  ईट, माणकेश्वर मंडळांत अतिवृष्टी  

सयाजी शेळके : 
शुक्रवार, 10 जुलै 2020

उस्मानाबाद शहराला गुरुवारी रात्री पावसाने चांगलेच झोडपले असून अतिवृष्टी होऊन तब्बल ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय भूम तालुक्यातील ईट आणि माणकेश्वर या दोन मंडळांमध्येही अतिवृष्टी झाली आहे.

उस्मानाबाद : उस्मानाबाद शहराला गुरुवारी रात्री पावसाने चांगलेच झोडपले असून अतिवृष्टी होऊन तब्बल ९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय भूम तालुक्यातील ईट आणि माणकेश्वर या दोन मंडळांमध्येही अतिवृष्टी झाली आहे. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
यंदा पावसाळ्यात शहरांमध्ये मोठा पाऊस झाला नव्हता. शहरवासीय मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत होते. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदाच्या पावसाळ्यातील तो सर्वाधिक पाऊस होता. काल पुन्हा एकदा पावसाने मनावर घेतले. सायंकाळी सव्वासातच्या सुमारास शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. तब्बल सव्वा तीन तास पाऊस कोसळत होता. त्यामुळे शहरातील छोटे- मोठे नाले ओसंडून वाहत होते. रस्ते आणि काही भाग पाण्याखाली गेला होता. शहरातून वाहणारी भोगावती नदी दुथडी भरून वाहत होती.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

अनेक सखल भागात पाणी साचले होते. यंदाच्या पावसाळ्यातील हा सर्वात मोठा पाऊस होता. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अनेक भागात पाणीच पाणी पाहायला मिळत होते. दरम्यान रात्री कार्यालयात अडकलेल्या अनेकांची धावपळ झाली. पावसात भिजतच घर गाठावे लागले. शिवाय रात्री बराच काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस आला म्हणजे वीज गायब होती, याचा प्रत्येय शहरवासीयांना आला.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

भूम परंडा तालुक्यात पाऊस

 भूम तालुक्यातील माणकेश्वर आणि ईट या दोन महसूल मंडळातील अतिवृष्टी झाली आहे. ईट महसूल मंडळात पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावली असून ८५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर माणकेश्वर महसूल मंडळात ७० मिलिमीटर पाऊस झाला आहे. तालुक्यातील इतर मंडळात ही समाधानकारक पाऊस झाला. तर परंडा तालुक्यातही चांगला पाऊस झाला आहे.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

उमरगा- लोहारा पावसाची दडी

उमरगा, लोहारा तालुक्याला पुन्हा एकदा पावसाने टाळले आहे. यंदाच्या पावसाळ्यात सर्वात कमी पाऊस उमरगा आणि लोहारा तालुक्यात झाला आहे. गुरुवारीही पावसाने या दोन्ही तालुक्याला ५ ते ७ मिलिमीटर पावसाची दोन्ही तालुक्यात नोंद झाली आहे. उस्मानाबाद शहरात ९५ मिलिमीटर पाऊस झाला असला तरी तालुक्यातील इतर मंडळात अगदीच नगण्य पाऊस आहे.

घरातल्या घरात तपासणीकडे वाढला कल, आरोग्याबाबत लातूरकर जागरूक   

विशेष म्हणजे उस्मानाबाद ग्रामीण महसूल मंडळात केवळ दहा मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर इतर मंडळातही कुठे दोन तर कुठे तीन मिलिमीटर पाऊस झाला आहे. तुळजापूर तालुक्यात ही कमी पाऊस आहे. तर कळंब तालुक्यातील काही महसूल मंडळात चांगला पाऊस झाला असून अन्य मंडळात मात्र पावसाने दडी मारली आहे. वाशी तालुक्यात  बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. 

संपादन : प्रताप अवचार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain it, Mankeshwar mandal