Corona-virus : हिंगोलीत कोरोना मीटर सुरूच; शनिवारी २३ जणांना लागण, तीन बालकांचा समावेश 

corona.jpg
corona.jpg

हिंगोली : जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून शनिवारी (ता.२५) प्राप्त अहवालानुसार २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून यामध्ये १५ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये सापडले असल्याने जिल्ह्यात कोरोना मीटरचा आकडा वाढत असून  लिंबाळा क्वारंटाइन येथील मृत्यू झालेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याचे डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोना मीटर उपाय योजना केल्यातरी थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा ५५६ च्या घरात गेला आहे. आज प्राप्त अहवालानुसार आढळून आलेल्या कोरोना रुग्णांपैकी १५ रुग्ण हे अँटीजन टेस्ट मध्ये सापडले आहेत. 

यातील हिंगोली शहरातील वंजारवाडा येथील १५ रुग्ण आहेत. यामध्ये ३५, ३६, ७५, ५२, ४४ वर्ष महिला ३२, २६, ३०, ३७, १९, ३२, १८, वर्ष पुरुष असून यात ८, ५, वर्षाचा मुलगा असून सात महिन्याच्या बाळाचा समावेश आहे. आझम कॉलनी येथील तिघे असून यामध्ये ६०, ३० वर्ष पुरुष तर ५० वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. पुन्हा एका आझम कॉलनी येथील ८० वर्षीय महिला कोरोना व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कोरोना सेंटर येथे भरती करण्यात आले होते. मात्र त्या महिलेचा मृत्यू झाला असून त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच एसआरपीएफ येथील एका ३४ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. तर शहरातील खडकपुरा येथील एका ५० वर्षीय महिलेस बाधा झाली आहे. तालुक्यातील कलगाव येथील दोघांना लागण झाली असून यात ४०, १७ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

आज रोजी चार रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये वसमत येथील रेल्वे रोड, बहिर्जी नगर, एक पारडी बुद्रुक या तिघांचा समावेश आहे. तर एक रुग्ण सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती होता. तो बरा झाला असल्याने सुट्टी देण्यात आली. तो जयपूरवाडी येथे राहत आहे. जिल्ह्यात नव्याने २३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर चार रुग्ण बरे झाले आहेत. तर एका महिलेचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह निघाला आहे.

जिल्हानंतर्गत आयसोलेशन वॉर्ड सर्व कोरोना सेंटर व गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वारंटाइन सेंटर अंतर्गत एकूण ७०६२ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ६३०६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. ६३३४ जणांना सुट्टी देण्यात आली. सद्यस्थितीला ७०१ रुग्ण भरती असून आज रोजी २४० जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर सहा रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आयसोलेशन वार्ड येथे भरती असलेल्या पैकी १४ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने ऑक्सिजन सुरु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

  • आतापर्यन्त जिल्ह्यात कोरोना रुग्ण  ५५६ 
  • बरे झाल्याने घरी परतले  ३५८
  • रुग्णावर उपचार सुरु  १९२  
  • कोविड रुग्णाचा मृत्यू  ०६ 
  • अहवाल प्रलंबित २४० 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com