जालन्यात आठ हातभट्ट्या उद्ध्वस्त 

उमेश वाघमारे 
Wednesday, 27 May 2020

शहरातील कैकाडी मोहल्ला येथे कुंडलिका नदीपात्रालगत सुरू असलेल्या आठ हातभट्ट्या मंगळवारी (ता.२६) कदीम जालना पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांना पाहून हातभट्टीचालक पसार झाले. 

जालना -  शहरातील कैकाडी मोहल्ला येथे कुंडलिका नदीपात्रालगत सुरू असलेल्या आठ हातभट्ट्या मंगळवारी (ता.२६) कदीम जालना पोलिसांनी उद्ध्वस्त केल्या आहेत. दरम्यान, पोलिसांना पाहून हातभट्टीचालक पसार झाले. 

शहरातील कैकाडी मोहल्ला, नूतन वसाहत अशा काही भागांत हातभट्टी दारूची निर्मिती केली जाते. शहरातील या काही भागांत हातभट्टीची चूल सतत पेटलेली असते. लॉकडाउनच्या काळात मद्यविक्री बंद होती त्यावेळी हातभट्टी दारूनिर्मितीचा गोरखधंदा चांगलाच तेजीत होता.

हेही वाचा : कोरोनामुक्तीच्या लढ्यासोबत जनतेची काळजी 

दरम्यान, मंगळवारी (ता.२६) कदीम जालना पोलिसांना कैकाडी मोहल्ला येथील कुंडलिका नदीपात्रालगत हातभट्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा टकला; मात्र पोलिसांची गाडी पाहताच हातभट्टीचालकांनी येथून पळ काढला.

हेही वाचा : कोरोनाशी मुकाबल्यासोबत गुन्हेगारांचा बीमोड 

यावेळी कदीम जालना पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी आपल्या पथकासह आठ हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. लाखो रुपयांची गावठी दारू आणि रसायन नष्ट केले. दरम्यान, पोलिसांनी हतभट्ट्यांवर कारवाईत सातत्य ठेवले तरच हातभट्टी चूल बंद होईल. 

मसई तांड्यावर गावठी दारू जप्त 

अंबड तालुक्यातील मसई तांडा येथे मंगळवारी (ता.२६) विशेष पथकाने छापा टाकून ४० हजार ५०० रुपयांची हातभट्टी दारू जप्त केली; तसेच दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. शहरासह जिल्ह्यात अवैध गावठी दारूनिर्मितीसह विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिस अधीक्षक चैतन्य एस. यांनी विशेष पथक स्थापन केले आहे. या पथकाने मागील महिनाभरापासून शहरासह जिल्ह्यात सुरू असलेल्या हातभट्ट्यांची माहिती घेऊन रोज छापे टाकले जात आहेत. यात मंगळवारी अंबड तालुक्यातील मसई तांडा येथे हातभट्टी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने येथे छापा टाकून ४० हजार ५०० रुपयांची हातभट्टी दारू व रसायन नष्ट केले. याप्रकरणी भीमराव राठोड, अंकुश जाधव (दोघे रा. मसई तांडा, ता. अंबड, जि. जालना) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलिस उपनिरीक्षक संपत पवार, कर्मचारी धनाजी कावळे, रामेश्वर बघाटे, सुभाष पवार, सुरेश राठोड, राजेंद्र वेलदोडे, राम पव्हरे, यशवंत मुंढे, परमेश्वर धुमाळ, किशोर जाधव, सर्जेराव हिवाळे, दीपक अंभोरे, महिला कर्मचारी अलका केंद्रे, रत्नमाला एडके यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal liquor seized in Jalna

Tags
टॉपिकस
Topic Tags: