Corona-Virus : जालन्यात नऊ कैद्यांना कोरोना; स्वतंत्र वॉर्डात उपचार

jalna jilha karaguh.jpg
jalna jilha karaguh.jpg

जालना : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत असताना आता जिल्हा कारागृहातही कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींना मागील चार महिन्यात जिल्हा कारागृहात दाखल करण्यात आलेल्या कैदांपैकी नऊ कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

या नऊ कैद्यांवर जालना येथील कोविड रूग्णालयात सध्या स्वतंत्र वार्डामध्ये उपचार सुरु आहेत. उपचारादरम्यान हे कैदी पळून जाऊ नये म्हणून पोलिसांसह जिल्हा कारागृह अधिकारी, कर्मचाऱ्यांचा येथे बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्हा कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कैद्यांची कोरोनाची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जिल्हा कारागृहातील अधिकारी, कर्मचारी आणि २१० कैद्यांची आरोग्य विभागामार्फत अॅंटीजेन टेस्टव्दारे कोरोना चाचणी करण्यात आली. त्यापैकी नऊ कैदी हे कोरोनाबाधित आढळून आले. त्यानंतर जालना येथील कोव्हीड रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

यातील सात कैदी हे मागील चार महिन्यांपूर्वी पोलिसांनी विविध गुन्ह्यात अटक करून न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा कारागृहात दाखल केले होते. तर दोन कैद्यांना जिल्हा कारागृहात दाखल होण्यापूर्वीच त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. उपचारादरम्यान हे कैदी रूग्णालयातून पसार होऊ नये, म्हणून त्यांना स्वतंत्र वार्डात ठेवण्यात आले आहे. तसेच पोलिसांसह जिल्हा कारागृह प्रशासनाना बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे. 

दरम्यान आज घडीला जिल्हा कारागृहात २२४ कैदी आहेत. कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर मागील चार महिन्यांपासून जिल्हा कारागृहात नव्याने दाखल होणाऱ्या कैद्यांना वेगळे ठेवले जात आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर सुरू होण्यापूर्वी जिल्हा कारागृहात दाखल झालेल्या कैद्यांच्या संपर्कात नवीन आलेल्या कैद्यांना जिल्हा कारागृह प्रशासन येऊ देत नाही. परिणामी जिल्हा कारागृहात असलेल्या जुन्या कैद्यांचे कोरोनापासून संरक्षण झाले आहे.

Edit By Pratap Awachar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com