JALNA CORONA : ७१ जण कोरोनामुक्त, ५८६ जणांचे अहवाल प्रलंबित 

corona 12.jpg
corona 12.jpg

जालना : मागील काही दिवसांपासून कोरोना चाचणी अहवाल प्रलंबित राहत असल्याचे दिसून आहेत. मंगळवारीही (ता. सहा) तब्बल ५८६ कोरोना चाचणीचे अहवाल येणे प्रलंबित होते. अशीच स्थिती सोमवारीसुद्धा होती. दरम्यान, मंगळवारी उपचारानंतर ७१ जण कोरोनामुक्त झाले तर नव्याने ३० जण बाधित आढळून आले. एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. 

जालना शहरातील आनंदवाडी येथील ८२ वर्षीय पुरुषाचा मंगळवारी (ता.सहा) कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत २२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उपचार घेतलेले ७१ जण बरे झाले आहेत. दरम्यान, नवीन ३० कोरोनाबाधितांची भर पडली, यात जालना शहरातील चार जण, मंठा तालुक्यातील वांजोळा येथील एक जण, बदनापूर तालुक्यातील काजळा येथील एक जण, केळीगव्हाण येथील दोन जण व इतर जिल्ह्यातील दोन जणांचा समावेश आहे. यातील १० जणांची आरटीपीसीआरद्वारे तर २० जणांची अॅंटीजेन द्वारे कोरोना चाचणी झाली होती. 


जिल्ह्यात आतापर्यंत आठ हजार ८४३ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत, त्यांपैकी सात हजार ४७ जणांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. सध्या एक हजार ५६७ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. 

अहवालांना विलंब 
गेल्या सहा महिन्यांपासून जिल्ह्यात प्रत्येक दिवसाला कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. त्यामुळे कोरोना चाचणी अहवाल तत्काळ मिळावे यासाठी आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री राजेश टोपे यांनी जालना शहरात आरटीपीसीआर प्रयोगशाळा मंजूर करून ती कार्यान्वित केली आहे. तर दुसरीकडे अॅंटीजेन तपासणीव्दारे ही कोरोनाच्या चाचण्या करण्यावर जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने भर दिला आहे. मात्र, असे असले तरी मागील काही दिवसांपासून चाचणीसाठी पाठविलेले शेकडो अहवाल प्रलंबित असल्याचे दिसून येत आहेत. रविवारी (ता.चार) ६४७, सोमवारी (ता.पाच) ४४० तर मंगळवारी (ता. सहा) तब्बल ५८८ कोरोना चाचणीसाठी पाठविलेले अहवाल प्रलंबित राहिले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने प्रलंबित अहवालांकडे लक्ष देणे अपेक्षित आहे. 
 

कोरोना चाचणीबाबत प्रयोगशाळेत अडचण नाही. चाचणीसाठी स्वॅबची साखळी लावलेली असते. अनेकदा कोरोनाचा रोजचा रिपोर्ट तयार करण्याच्या वेळेपर्यंत कोरोना चाचणीचे अहवाल येत नाहीत, त्यामुळे अहवाल प्रलंबित असल्याचे रिपोर्टमध्ये नमूद होते. 
- डॉ.अर्चना भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक, जालना. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com