Coronavirus : जालन्याच्या खानेपुरी गावात ३५ जण बाधित, दोघांचा मृत्यू;  ६८ बाधितांची भर

उमेश वाघमारे  
Tuesday, 1 December 2020

जालना तालुक्यातील खानेपुरी येथे सोमवारी (ता.३०) ३५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या गावाची एकूण लोकसंख्या ही पंधराशे आहे. या ठिकाणी एक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याच सप्ताहामध्ये एक जण कोरोना संशयित आढळून आला होता. त्यानंतर हा धार्मिक कार्यक्रम थांबविण्यात आले. त्यामुळे या गावातील ग्रामस्थ घाबरले होते. परिणामी आरोग्य यंत्रणेने पन्नास जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात ३५ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

जालना : जिल्ह्यात पुन्हा दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर नव्याने ६८ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असून १११ रूग्ण सोमवारी (ता.३०) कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सोमवारी (ता.३०) दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ३१९ जणांचा कोरोनाने बळी गेले आहेत. तर ६८ नवीन कोरोनाग्रस्तांची भर पडली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
यामध्ये जालना तालुक्यातील खानेपुरी येथील तब्बल ३५ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर जालना शहरात १६, तालुक्यातील अंतरवाला, खरपुडी येथील प्रत्येकी एक, परतूर तालुक्यातील गोळेगाव गेवराई येथील दोन, अंबड शहरातील एक, तालुक्यातील शहागड, डोमलगाव येथील प्रत्येकी एक, बदनापूर तालुक्यातील पिंरवाडी, नानेगाव, गेवराई बाजार येथील प्रत्येकी एक, जाफराबाद शहरातील एक, तालुक्यातील टेंभुर्णी येथील दोन, पोखरी, जानेफळ, निवडुंगा येथील प्रत्येकी एक तर बुलडाणा जिल्ह्यातील एक जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंत १२ हजार ३५१ कोरोनाग्रस्त रूग्ण निष्पन्न झाले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दरम्यान, १११ जण उपचाराअंती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ११ हजार ७१३ रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. परिणामी सध्या जिल्ह्यात ३१९ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात १३ जण अलगीकरणात 
जिल्ह्यातील पंधरा जणांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये अंबड येथील शासकीय मुलींचे वसतीगृह येथे १३ जणांना अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एकाच गावात ३५ पॉझिटिव्ह 
जालना तालुक्यातील खानेपुरी येथे सोमवारी (ता.३०) ३५ जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या गावाची एकूण लोकसंख्या ही पंधराशे आहे. या ठिकाणी एक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र याच सप्ताहामध्ये एक जण कोरोना संशयित आढळून आला होता. त्यानंतर हा धार्मिक कार्यक्रम थांबविण्यात आले. त्यामुळे या गावातील ग्रामस्थ घाबरले होते. परिणामी आरोग्य यंत्रणेने पन्नास जणांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यात ३५ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे सोमवारी (ता.३०) दुपारी पुन्हा ६१ जणांचे नमुने आरोग्य विभागाने कोरोना चाचणीसाठी घेतले आहेत. तसेच मंगळवारी (ता.एक) ही आरोग्य यंत्रणेचे पथकाकडून या गावात सर्वेक्षण केले जात आहे. दरम्यान गावात सॅनिटायझरची फवारणी करण्यात अली आहे, असे आरोग्य अधिकारी शीतल सोनी यांनी सांगितले आहे.

जालना कोरोना आकडेवारी 

  • एकूण कोरोनाबाधित ः १२ हजार ३५१ 
  • एकूण कोरोनामुक्त ः ११ हजार ७१३ 
  • एकूण मृत्यू ः ३१९ 
  • उपचार सुरू ः ३१९ 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna corona Update today 68 new corona patient Khanepuri town 35 positive