जालना जिल्ह्यात ३२ जणांना कोरोना, १३ हजार ४०० रुग्ण कोरोनामुक्त 

Jalna Corona Updates
Jalna Corona Updates

जालना : जिल्ह्यात बुधवारी (ता.दहा) नव्याने ३२ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तसेच आठ कोरोनाबाधित उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली-वर होणे सुरूच आहे. बुधवारी पुन्हा ३२ कोरोनाबाधित रूग्णांची भर पडली.

यामध्ये जालना शहरातील नऊ, तालुक्यातील खरपुडी येथील एक, परतूर शहरातील एक, रायगव्हाण, वाटूर फाटा येथील प्रत्येकी एक, घनसावंगी शहरातील एक, मानेपुरी, सोनक पिंपळगाव येथील प्रत्येकी एक, अंबड शहरातील एक, बदनापूर तालुक्यातील वरूडी व चिखली दाभाडी येथील प्रत्येकी एक, जाफराबाद तालुक्यातील अकोलादेव येथील एक, भोकरदन शहर तीन, राजूर व केदारखेडा येथील प्रत्येकी एक व इतर जिल्ह्यातील बुलडाणा येथील सात जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

त्यामुळे आतापर्यंत १३ हजार ९७१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. दरम्यान बुधवारी आठ जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे आतापर्यंत १३ हजार ४०० जण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ३७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात १९९ कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत.


संपादन - गणेश पिटेकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com