जालना : तलावातील पाणी उपसा बंद करण्यासाठी शेतकऱ्याचे जलसमाधी आंदोलन

बाबासाहेब गोंटे 
मंगळवार, 30 जून 2020

अंबड तालुक्यातीळ खडकेश्वर-ताड हदगाव येथील लघु पाझर तलावात येथील शेतकरी कुंडलिक विश्वनाथ हरिश्चंद्रे यांनी मंगळवारी (ता.३०) तलावातील पाणी उपसा बंद करण्यासाठी जलसमाधी आंदोलन सुरू केले. पोलिसांनी तात्काळ धाव घेत आंदोलक शेतकर्याला ताब्यात घेतले. 

अंबड  (जि.जालना)  : अंबड तालुक्यातीळ खडकेश्वर-ताड हदगाव येथील लघु पाझर तलावात येथील शेतकरी कुंडलिक विश्वनाथ हरिश्चंद्रे यांनी मंगळवारी (ता.३०) तलावातील पाणी उपसा बंद करण्यासाठी जलसमाधी आंदोलन सुरू केले. पोलिसांनी तात्काळ धाव घेत आंदोलक शेतकर्याला ताब्यात घेतले. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

ताडहदगाव (ता. अंबड जि.जालना) येथील शेतकरी हरिश्चंद्रे यांनी यापूर्वी प्रशासनाला वेळोवेळी लेखी निवेदन देऊन, खडकेश्वर-ताड हदगाव येथील लघु पाझर तलावातील जलसाठ्यावर अनेकांनी रात्री-बेरात्री तसेच दुपारी
पाण्याचा सर्रास उपसा सुरुच असल्याचे निर्दशनात आणून दिले. पाझर तलावातील होणार पाणी उपसा तात्काळ बंद करून पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठी राखीव ठेवण्यात यावा अशी लेखी स्वरूपात मागणी प्रशासनाकडे केली.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

मात्र प्रशासनाने याकडे सतत कानाडोळा केला. अखेर शेतकरी हरिश्चंद्रे यांनी प्रशासनाला जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला. मंगळवारी ता.३० सकाळपासून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. 
याप्रसंगी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रायबेले, महसूल विभागाचे मंडळाधिकारी शिवाजी गाडेकर, तलाठी प्रतिमा नागरे व अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजुळ यांनी भेट दिली. तलावात जलसमाधी आंदोलन करण्यास बसलेले कुंडलिक हरिश्चंद्रे याना पोलीस उपनिरीक्षक शैलेश शेजुळ यांनी पाण्याच्या बाहेर काढून ताब्यात घेतले आहे

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

आंदोलन पाहण्यासाठी गर्दी

खडकेश्वर तलावात जलसमाधी आंदोलनास बसलेल्या कुंडलिक हरिश्चंद्रे यांना पाहण्यासाठी ताडहदगाव, बनगाव, खडकेश्वर, भालगाव, पांगरखेडासह परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna district Farmer Jalasamadhi movement