esakal | जालना जिल्ह्यात नऊ शिक्षकांना कोरोना, एकाच शाळेतील तीघांचा समावेश
sakal

बोलून बातमी शोधा

corona test enbeded.jpg

जालना जिल्ह्यात एकूण नऊ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात विशेष करुन एकाच शाळेतील तीन शिक्षकांचा समावेश आहे. त्यामुळे शिक्षक वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जालना जिल्ह्यात नऊ शिक्षकांना कोरोना, एकाच शाळेतील तीघांचा समावेश

sakal_logo
By
सुहास सदाव्रते

जालना : जालना तालूक्यातील मोतीगव्हाण येथील एका माध्यमिक शाळेतील तीन शिक्षकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. तर अंबड व बदनापूर तालूक्यातील विविध शाळेतील सहा शिक्षकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकाच दिवशी जालना जिल्ह्यात नऊ शिक्षकांना कोरोनाची लागण झाली आहे. या प्रकारामुळे शिक्षक वर्गात पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.   

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शिक्षण व आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार जिल्ह्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची आरोग्य तपासणी युध्द पातळीवर सुरु आहे. दोन दिवसापासून जिल्ह्य़ातील विविध माध्यम व व्यवस्थापनाच्या शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तपासणी करण्यात येत आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शहरातील संस्कार प्रबोधिनी विद्यालय, सरस्वती भुवन प्रशालेत शुक्रवारी (ता.२०) शिक्षकांची तपासणी करण्यात आली. जामवाडी (ता.जालना) येथील रंगनाथराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. मोतीगव्हाण (ता.जालना) येथील एका शाळेतील तीन शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबंधित शिक्षकांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मौजपुरी, रामनगर येथील शाळेतील शिक्षकांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणी केलेल्या पैकी अकरा व्यक्तीचे अहवाल येणे बाकी असल्याचे डॉ. जाधव यांनी सांगीतले. सदर शाळेतील शिक्षकांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने येथील शाळा बंद राहणार आहेत. दोन दिवसात जालना शहरासह जिल्ह्यातील विविध शाळेतील शिक्षक चाचणी केली असून अनेक शिक्षकांचे अहवाल अद्याप आलेले नाहीत. यामुळे निश्चित आकडेवारी मिळत नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे.

(संपादन-प्रताप अवचार)

loading image
go to top