जालना जिल्ह्यातील सहा मंडळात अतिवृष्टी, वाचा कुठे-किती झाला पाऊस..

उमेश वाघमारे
Friday, 24 July 2020

अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळात तब्बल १३६ मिलिमीटर, गोंदी मंडळात ९५ मिलिमीट पााऊस झाला. तर जालना तालुक्यातील शेवली मंडळात ६८ मिलिमीटर, भोकदरन तालुक्यातील अन्वा मंडळात ८० मिलिमीटर, हसनाबद मंडळात ७० मिलिमीटर, परतूर तालुक्यातील परतूर मंडळात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

जालना : जालना शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (ता.२३) जोरदार श्रावणाच्या सरी कोसळल्या आहेत. परिणामी सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळात सर्वाधिक १३६ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.२४) सकाळपर्यंत मागील चोविस तासांमध्ये जिल्ह्यात  २६.९५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   
जिल्ह्यासह जालना शहरात गुरूवारी (ता.२४) पावसाने हजेरी लावली. दुपारपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाला सुरवात झाली होती. जिल्ह्यात सर्वदुर झालेल्या पावसामुळे सहा मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

यात अंबड तालुक्यातील वडीगोद्री मंडळात तब्बल १३६ मिलिमीटर, गोंदी मंडळात ९५ मिलिमीट पााऊस झाला. तर जालना तालुक्यातील शेवली मंडळात ६८ मिलिमीटर, भोकदरन तालुक्यातील अन्वा मंडळात ८० मिलिमीटर, हसनाबद मंडळात ७० मिलिमीटर, परतूर तालुक्यातील परतूर मंडळात ६५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. बदनापूर तालुक्यातील दाभाडी मंडळात ४४ मिलिमीटर, भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई मंडळात ४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

दरम्यान जालना तालूक्यात २१.५० तर आतापर्यंत ४३५.७८ मिलीमीटर, बदनापूर तालुक्यात १९.८० तर आतापर्यंत ५८७.८० मिलीमीटर, भोकरदन तालुक्यात ३९.१३ तर आतापर्यंत ४८२.९७ मिलीमीटर, जाफराबाद तालुक्यात २३.४० तर आतापर्यंत ४०९.८० मिलीमीटर, परतूर तालुक्यात २७.२० तर आतापर्यंत ३५७.८० मीलीमीटर, मंठा तालुक्यात १७.२५ तर आतापर्यंत ३६४.७५ मिलीमीटर, अंबड तालुक्यात ४५.४३ तर आतापर्यंत ६०७.७२  मिलीमीटर तर घनसावंगी तालुक्यात २१.८६ तर आतापर्यंत ४०८.६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात ता. एक जून ते आतापर्यंत ४५४.२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

(संपादन-प्रताप अवचार)
                                                                                                                                                                                                        


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna district rainfall in six circle