जालना महामार्गावर दुचाकी-ट्रकचा अपघात; सोयगावच्या युवकाचा मृत्यू 

बाबासाहेब गोंटे 
Thursday, 27 August 2020

सोयगाव तालुक्यातील जामठीतांडा येथील तरुण हा जालना शहरकडून उस्मानाबादकडे जात होता. अंबड शहरालगत त्याला अंबड कडून जालन्याकडे जाणाऱ्या मालट्रकने उडविल्याने तो जागीच गतप्राण झाला.

अबंड (जि.जालना) : जालना महामार्गावरील पारनेर पेट्रोलपंपालगत डाबरूळ फाट्यावर दुचाकी-ट्रकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीचालक युवक पुनमचंद शेषराव जाधव (वय२०) हा जागीच ठार झाला आहे. मृत युवक हा औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील जामठीतांडा येथील आहे.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोयगाव तालुक्यातील जामठीतांडा येथील तरुण हा जालना शहरकडून उस्मानाबादकडे जात होता. अंबड शहरालगत त्याला अंबड कडून जालन्याकडे जाणाऱ्या मालट्रकने उडविल्याने तो जागीच गतप्राण झाला. या घटनेची माहिती कळताच परिसरातील ग्रामस्थ मदतीसाठी धावले. मात्र, दुचाकीस्वार जाग्यावरच ठार झाला होता. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांना माहिती मिळताच अंबड पोलिस ठाण्याचे फौजदार नारायण शेळके, कचरू दाभाडे, लहाने सह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने पुनमचंद जाधव यांचा मृतदेह अंबडच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेतून नेण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रीया सुरु होती. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna highway accident news young man death