कळंब : कोरोनाने एकाचा मृत्यू, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या झाली १४ 

दिलीप गंभीरे 
Wednesday, 29 July 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिस वाढत आहे. सुरुवातीला कळंबच्या शेजारील असलेल्या डिकसळ गावापुरता मर्यादित असणारा कोरोना आता शहरात पोहचला असून जुलैचा शेवटचा आठवडा कळंबकराची झोप उडविणार ठरला आहे.

कळंब (उस्मानाबाद) : शहरातील बड्या व्यापाऱ्याच्या एकाच कुटूंबातील ९ जणाला कोरोनाची बाधा झाल्याने कळंबकरांना मंगळवारचा दिवस धक्का देणारा ठरला आहे. शिवाय ५५ वर्षीय सराफ व्यपाऱ्याचा मृत्यू झाला असून त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

तालूक्यातील मंगरूळ गावात एक तर डिकसळ गावात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. कोरोनाचे वारे शांत झाले होते. मात्र शहरातील बड्या व्यपाऱ्याच्या घरातील महिलेचा मृत्यू झाला होता. अंत्यविधीसाठी बार्शी येथून काही नातेवाईक आले होते. तेथून कोरोना शहरात पसरला असल्याची माहिती समोर आली आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेदिस वाढत आहे. सुरुवातीला कळंबच्या शेजारील असलेल्या डिकसळ गावापुरता मर्यादित असणारा कोरोना आता शहरात पोहचला असून जुलैचा शेवटचा आठवडा कळंबकराची झोप उडविणार ठरला आहे. पोलीस, महसूल, आरोग्य प्रशासनाकडून घालून देण्यात आलेल्या नियमांचे नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याने कळंब तालुक्यात टाळेबंदी करण्याची गरज निर्माण झाली आहे. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

शहरातील एका बड्या व्यपाऱ्याच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला. बार्शी येथील काही नातेवाईक अंत्यविधीला हजर राहिले होते. तेथून कळंब शहरात कोरोना पसरला असून एकाच कुटूंबातील ९ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यांच्या संपर्कातील ३५ जणाला प्रशासनासकडून मंगळवारी (ता.२८) क्वारंटाईन केले असून २३ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविले आहेत.

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका   

मृत्यूनंतर स्वॅब नमुना पॉझिटिव्ह

शहरातील सराफ व्यापाऱ्याचा मृत्यू झाला होता. पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून अंत्यविधी करण्यात आला. त्यामुळे या मृत व्यापाऱ्याना कोठून बाधा झाली असा प्रश्न उपस्थित होत असून यांच्या संपर्कातील व्यक्तीच्या अडचणीत वाढ झाली आहे. दरम्यान शहरातील शिवाजी नगर भागातील एक रुग्ण पॉझिटिव्ह आला असून तो पुण्याहून आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णलयाचे वेधकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली असून शहर, ग्रामीण भागात आता १४ रुग्णांची संख्या झाली आहे.

संपादन-प्रताप अवचार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kalanb one corona death active corona positive 14