esakal | Coronavirus : औषध आणायला गेले, अन् कोरोना बाधित झाले ! या गावातील नागरिकांची उडाली झोप
sakal

बोलून बातमी शोधा

corona.jpg

कळंब तालूक्यातील येरमळा येथील वाणी गल्लीतील ६५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आल्याने नागरिकाची झोप उडाली आहे. प्रशासनाने हा संपूर्ण परिसर कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. येरमळा येथील कोरोना बाधित हे बार्शी येथे औषध उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेले होते. 

Coronavirus : औषध आणायला गेले, अन् कोरोना बाधित झाले ! या गावातील नागरिकांची उडाली झोप

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब (उस्मानाबाद) : तालूक्यातील येरमळा येथील वाणी गल्लीतील ६५ वर्षीय पुरुष कोरोना बाधित आढळून आल्याने नागरिकाची झोप उडाली आहे. प्रशासनाने हा संपूर्ण परिसर कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. येरमळा येथील कोरोना बाधित हे बार्शी येथे औषध उपचारासाठी खासगी रुग्णालयात गेले होते. 

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

यांचा बार्शीतील व्यक्तींचा संपर्क आल्याने कोरोनाची लक्षणे असल्याचा संशय आल्याने त्यांचा स्बॉव नमुना घेण्यात आला. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्यामुळे त्यांना तेथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यांच्या संपर्कातील सात व्यक्तींना येथील कोरोना सेंटर मध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
 

दोन महिन्यानंतर कोरोनाने कळंब तालुक्याची दारे उघडली आहेत. काही महिन्यांपूर्वी कळंब तालुका कोरोनामुक्त झाला होता. मुक्तीनंतर प्रशासनाने गांभीर्य घेतले नाही, त्यामुळे या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात नागरिक सहज प्रवेश करीत आहेत. सोलापूर जिल्ह्याकडे कोरोना हॉटस्पॉट म्हणून पाहिले जात आहे. येरमळा येथील वाणी गल्लीत राहणारे कुटूंब बार्शी येथे गेल्या कित्येक वर्षापासून वास्तव्यास आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने टाळेबंदी केली त्यामुळे हे कुटूंब टाळेबंदीची घोषणा झाल्यापासून येरमळा येथे मूळ गावी रहात आहे. मात्र बार्शीकडे नेहमीच ये-जा होती. शुक्रवारी (ता.१०) ६५ वर्षीय पुरुष यांना जुलाब झाल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे बार्शी येथील  खासगी रुग्णालयात औषध उपचारासाठी गेले होते.

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

 प्राथमिक तपासणी करून स्वाब नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना लागलीच बार्शीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही बाब कळंबच्या कोरोना पथकाला समजताच. त्यांनी येरमळा येथील वाणी गल्लीचा परिसर कोरोना प्रतिबंधात्मक म्हणून घोषित केला असून शनिवारी संपूर्ण परिसर सील करण्याची कारवाई करण्यात आली आहे.

औरंगाबादच्या ‘घाटी’ रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीसाठी हालचाली 

कुटूंबातील सात व्यक्ती क्वारंटाईन 

दरम्यान ६५ वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती कळताच उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी संबधित कोरोना पथकाला तात्काळ हा भाग कोरोना प्रतिबंधात्मक करण्याच्या सूचना केल्या.  कुटूंबातील सात सदस्यांना कळंब मधील कोरोना सेंटर मध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे.

संपादन : प्रताप अवचार 

loading image