कळंब : 'त्या' बॅंक व्यवस्थापकाला कोरोना झाला तरी कोठून ? कारण गुलदस्त्यात...

corona.jpg
corona.jpg

कळंब (जि. उस्मानाबाद) :  येथील उस्मानाबाद जनता बॅंकेचे सरव्यवस्थापक कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली असून ते रोज उस्मानाबादला ये-जा करत होते. त्यामुळे त्यांना कोठून कसा कोरोनाचा संसर्ग झाला हे शोधणे मोठं आवाहन आहे. 

दरम्यान त्यांना कोरोनाची लक्षणे असल्याने उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयातून सोलापूरला हलविण्यात आले. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्या कुटूंबातील तिघांना क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. शहरातील ढोकी बायपास रोड व घराचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र केला आहे.

मागच्या आठवड्यात येथील ६० वर्षीय बाधित व्यक्तीला बॅंकेत असताना अस्वस्थ वाटू लागल्याने सुरुवातीला उस्मानाबाद रुग्णालयात उपचार घेतले. नंतर अस्वस्थपणा कमी न झाल्याने त्यांना सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांचा स्वॅब अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. त्यांच्या संपर्कातील तिघांना कोरोना पथकाने येथील कोरोना सेंटर मध्ये दाखल करून घेतले. त्यांचे स्वॅब मंगळवारी तपासणीसाठी पाठविले आहेत. दरम्यान उपविभागीय अधिकारी अहिल्या गाठाळ यांनी आदेश काढून मंगळवारी रात्री शहरातील बायपास रोड आणि घराचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र केला आहे.

संसर्ग झाला कोठून?

बाधित ६० वर्षीय हे उस्मानाबाद जनता बॅंकेच्या मुख्य कार्यालयात सरव्यवस्थापक म्हणून काम पहात आहेत. हे रोज स्वतःच्या कार ने ये-जा करतात अशी माहिती आहे. बाधित रुग्णाला कोठे संसर्ग झाला याबाबतचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे. दरम्यान त्यांच्या कुटूंबातील तिघा व्यक्तीना क्वारांटाईन करण्यात आले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे यांनी दिली आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com