लातूर : कोरोनाबाधितांवर परिणामकारक ठरणाऱ्या इंजेक्शनसाठी तब्बल ३७ लाख..! वाचा सविस्तर..! 

हरी तुगावकर
Sunday, 26 July 2020

या इंजेक्शन तसेच औषधाची ३७ लाख रुपयांची संबंधीत कंपनीला ऑर्डर देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात यातील काही औषधी लवकरच मिळतील. याचा रुग्णाला निश्चितच उपयोग होईल, या इंजेक्शन तसेच औषधाच्या निविदाही काढण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली.

लातूर : कोरोनाच्या गंभीर रुग्णासाठी टॉक्सिलिजुमाब, रेमडेसिवीर हे इंजेक्शन तसेच काही टॅबलेट प्रभावी ठरत आहे. त्यामुळे शासनाने ही इंजेक्शन तसेच औषधी खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार आता या इंजेक्शन तसेच औषधाची ३७ लाख रुपयांची संबंधीत कंपनीला ऑर्डर देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात यातील काही औषधी लवकरच मिळतील. याचा रुग्णाला निश्चितच उपयोग होईल, या इंजेक्शन तसेच औषधाच्या निविदाही काढण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय ढगे यांनी दिली.

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. यात अति गंभीर रुग्णावर उपचारासाठी टॉक्सिलिजुमाब, रेमडेसिवीर हे इंजेक्शन व फाविपायरावीर या टॅबलेटस प्रभावी ठरत आहेत. शासनाच्या आदेशानुसार जिल्हा पातळीवर फक्त तीन लाख रुपयांपर्यंतची खरेदी करता येते. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सात इंजेक्शन खरेदी करून ते विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेला दिली होती. त्याचा रुग्णावर वापर करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. ढगे यांनी दिली.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या संचालकंनी ता. १७ जुलै रोजी इंजेक्शन व औषधांची दरनिश्चितीचे पत्र पाठवून औषधे खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. त्यानुसार तातडीने संबंधीत कंपनीकडे ३७ लाखांची ऑर्डर देण्यात आली आहे. यात टॉक्सिलिजुमाब शंभर, रेमडेसिवीर दीडशे तसेच औषधाचाही समावेश आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

सध्या या इंजेक्शन व औषधाचा तुटवडा आहे. त्यामुळे टप्प्या टप्प्यात ते उपलब्ध होणार आहेत. लवकरच पहिला टप्प्‌यातील इंजेक्शन उपलब्ध होतील. त्याचा रुग्णांना लाभ होईल, असे डॉ. ढगे म्हणाले. या इंजेक्शन व औषधाच्या दरासंदर्भात निविदाही काढण्यात आल्या आहेत. त्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Edited by pratap awachar 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur 37 lakh order for injection