esakal | दिलासादायक : लातूरात पाच हजार रुग्णांनी मिळविला कोरोनावर विजय 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus.png

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण चांगले; कोरोना केअर सेंटरचा आधार

दिलासादायक : लातूरात पाच हजार रुग्णांनी मिळविला कोरोनावर विजय 

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला तरी लातूरकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आतापर्यंत पाच हजार ५२ नागरीकांनी कोरोनावर मात केली आहे. यात सर्वच वयोगटातील व्यक्तींचा  समावेश आहे. जिल्हयात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रुग्णालयापेक्षा कोरोना केअर सेंटरमध्येच राहून अनेक रुग्ण आपले घर जवळ करीत आहेत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..

जिल्ह्यात एप्रिलपासून कोरोनाची लागण सुरु झाली. पहिले दोन अडीच महिने लातूर जिल्हा सेफ झोनमध्ये होता. पण नंतर मात्र अनलॉक प्रक्रिया सुरु झाली आणि लातूर जिल्ह्यात कोरोना बाधित पुढे येवू लागले. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कोरोनाने अधिक विळखा घातल्याचे चित्र गेल्या दोन अडीच महिन्यात पहायला मिळाले. त्यात जिल्हयात अॅऩ्टीजेन टेस्ट सुरु केल्यापासून रुग्ण मोठ्या संख्येने समोर येवू लागले. ही बाब चिंताजनक असली तर एका दृष्टीने त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यास मदत झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने बाजूला काढून त्यांची काळजी घेण्यात आली. बुधवारपर्यंत जिल्ह्यात सहा हजार ७३३ एकूण बाधितांची संख्या होती. त्यापैकी केवळ एक हजार ४४३ जणांवरच उपचार सुरु आहे. तर आतापर्यंत पाच हजार ५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यात लहान मुलापासून ते वृद्ध नागरीकांपर्यंतच्या रुग्णाचा समावेश आहे. ही लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने चांगली बाब आहे. यात बहुतांश रुग्णांना प्रशासनाने तयार केलेल्या कोविड केअर सेंटरमध्येच ठेवण्यात आले होते. तेथेच त्यांच्यावर उपचार करण्यात आले. या कोविड केअर सेंटरचा मोठा आधार या रुग्णांना मिळाला आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लातूर जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर आणि त्यातून सोडण्यात आलेले रुग्ण 

  • महापालिकेचे कोविड सेंटर - ६६४
  • बारा नंबर पाटी येथील वसतिगृह - १५६४ 
  • विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था -५२९
  • उदगीरमधील दोन रुग्णालय व दोन सेंटर- ४७१
  • अहमदपूर कोविड केअर सेंटर - २०५
  • औसा कोविड केअर सेंटर - ३१२
  • निलंगा येथील रुग्णालय व कोविड सेंटर - ४१४

(संपादन-प्रताप अवचार)

loading image