esakal | Corona : लातूरात मृत्यू तांडव सुरुच; निवृत्त शिक्षकासह दोघांचा कोरोनाने घेतला बळी   
sakal

बोलून बातमी शोधा

corona death.jpg

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोनाने बाधित सेवानिवृत्त शिक्षकासह दोघांचा गुरुवारी (ता. नऊ) मृत्यू झाला.

Corona : लातूरात मृत्यू तांडव सुरुच; निवृत्त शिक्षकासह दोघांचा कोरोनाने घेतला बळी   

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर : येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत कोरोनाने बाधित सेवानिवृत्त शिक्षकासह दोघांचा गुरुवारी (ता. नऊ) मृत्यू झाला. उपचारासाठी दाखल झाल्यानंतर चोवीस तासाच्या आताच या सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला आहे. तर कर्करोगाने आजारी असलेल्या दुसरा रुग्णावर गेल्या तीन दिवसापासून उपचार सुरु होते. त्याचाही उपचारा दरम्यान गुरुवारी (ता. नऊ) मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २९ झाली आहे.

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच मृत्यूही वाढू लागले आहेत. उदगीर येथील एसटी कॉलनीतील रहिवासी असलेले एक सेवानिवृत्त शिक्षकाला (वय ५९) कोरोनाची लागण झाली होती. त्यांना बुधवारी (ता.८) येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. इतर कोणताही आजार नसताना देखील उपचारासाठी दाखल केले तेव्हा त्यांची प्रकृती गंभीर होती. उपचार सुरु असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

शहरातील एक व्यक्ती हैदराबादहून पॉझिटिव्ह होऊन येथे आला. तो साधूपिंडाच्या कर्करोगाने आजारी होता. त्याच्यावर केमोथेरपीही सुरु होती. तीन दिवसापूर्वी त्याच्यावर या संस्थेत कोरोनाचे उपचार सुरु होते. उपचार सुरु असतानाच त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. कोरोना विलगीकरण कक्षाचे प्रमुख डॉ. रामराव मुंडे यांनी ही माहिती दिली.

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

कोरोना मीटर

  • एकूण बाधित ५६६
  • उपचार सुरु २३३
  • बरे झालेले  ३०४
  • मृत्यू  २९

संपादन : प्रताप अवचार 

loading image