लातूरमध्ये २१ हजार रुग्णांनी केली कोरोनावर मात 

हरी तुगावकर
Saturday, 5 December 2020

जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. तरीदेखील रोज ४० ते ५० जणांना कोरोनाची लागण होत आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात २२ हजार २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी २१ हजार पाचजणांनी कोरोनावर मात केली आहे. 

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. तरीदेखील रोज ४० ते ५० जणांना कोरोनाची लागण होत आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात २२ हजार २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी २१ हजार पाचजणांनी कोरोनावर मात केली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जिल्ह्यात एप्रिलपासून कोरोनाचे रुग्ण समोर आले. एप्रिल ते जूनमध्ये रुग्णांचे प्रमाण कमी होते. त्यानंतर मात्र दिवसेंदिवस रुग्णाचा आकडा वाढत गेला. सप्टेंबरमध्ये तर हा आकडा दहा हजारांच्या घरात गेला. त्यानंतर ऑक्टोबरपासून रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होत चालली आहे. नोव्हेंबरमध्ये तर रुग्णांची संख्या लक्षणीय घटली. सरासरी चाळीस पन्नास रुग्ण आता समोर येत आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

नागरिकांनी तोंडाला मास्क लावणे, सतत हात धुणे, सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणे या नियमाचे पालन केले तर ही संख्या आणखी कमी होण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार २० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात ६५१ जणांचा मृत्यू झाला. सध्या ३६४ जणांवर उपचार सुरू आहेत. यापैकी १०८ जण घरातच उपचार घेत आहेत. आतापर्यंत २१ हजार पाच जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

एकूण बाधित - २२,०२० 
उपचार सुरू असलेले - ३६४ 
बरे झालेले - २१,००५ 
एकूण मृत्यू - ६५१ 

edit-pratap awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur corona update 21 thousand patients overcame coronary heart disease