
लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ५०५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.२) २१५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यात आणखी नऊ जणांचा कोरोनाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यामुळे लातूर जिल्ह्यात आतापर्यंत ५०५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दरम्यान शुक्रवारी (ता.२) २१५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा १७ हजार ५१५ वर गेला आहे.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
लातूर जिल्ह्यात ता. एक आक्टोबर रोजी सात जणांचा मृत्यू झाला. यात भातांगळी (ता. लातूर), निलंगा, औराद शहाजनी (ता. निलंगा), बोरी (ता. लातूर), जावळी (ता. औसा), अंधोरी (ता. अहमदपूर) येथील एक तर हरंगुळ (ता. लातूर) येथील एका महिलेचा मृत्यू झाला. तर ता. दोन आक्टोबर रोजी अलगरवाडी (ता. चाकूर) येथील एक व लातूरच्या एका महिलेचा कोरोनाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत एकूण मृत्यूचा आकडा ५०५ वर गेला आहे. यात येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थे उपचार सुरु असताना सर्वाधिक ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्या पाठोपाठ उदगीरच्या सामान्य रुग्णालयात ६९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान शुक्रवारी २१५ जणाना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकूण बाधितांचा आकडा १७ हजार ५१५ वर गेला आहे. सध्या दोन हजार ६४२ जणांवर उपचार सुरु असून १४ हजार ३६८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
असे झाले मृत्यू
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
लातूर कोरोना मिटर
(संपादन-प्रताप अवचार)