Corona : लातूरात आज सर्वाधिक ४१४ जण पॉझिटिव्ह, नऊ जणांचा मृत्यू, बळींची संख्या ३०५ वर

हरी तुगावकर
Friday, 4 September 2020

लातूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. चार) कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ३०५ जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. चार) आतापर्यंतची सर्वाधिक ४१४ नागरीकांना कोरोनाची लागण झाली आहे. 

लातूर : लातूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. चार) कोरोनामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने ३०५ जणांचा बळी घेतला आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. चार) आतापर्यंतची सर्वाधिक ४१४ नागरीकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या नऊ हजार ११५ वर गेली आहे.

आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी औरंगाबाद जिल्ह्यातून ३५ शिक्षकांचे प्रस्ताव 

जिल्हयात (ता.२९) ऑगस्ट रोजी उदगीर येथील ६४ वर्षीय, ता. दोन सप्टेंबर रोजी मुरुड येथील ६५ वर्षीय, भादा येथील ७० वर्षीय, लातूर येथील ४५ वर्षीय महिला, ममदापूर येथील ८५ वर्षीय महिला, ता. तीन सप्टेंबर रोजी उदगीर येथील ३६ वर्षीय, ता. चार सप्टेंबर रोजी कोरंगळा येथील ६० वर्षीय महिला, मुरुड येथील ८० वर्षीय महिला, उदगीर येथील ४९ वर्षीय महिलेचा कोरोनाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे ३०५ जणांचा बळी गेला आहे.

बालविवाह रेणापूरच्या तहसीलदारांनी रोखला, वधुवराच्या कुटुंबीयांचे केले समुपदेशन  

गेल्या काही दिवसापासून कोरोना बाधितांची संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. जिल्ह्यात ॲन्टीजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या आहेत. यात शुक्रवारी तर आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण समोर आले. या एकाच दिवशी ४१४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण बाधितांचा आकडा ९ हजार ११५ वर गेला आहे. सध्या दोन हजार २४१ जणांवर उपचार सुरु असून सहा हजार ५६९ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे निधन  

  • लातूर कोरोना मिटर
  • एकूण बाधित --९११५
  • उपचार सुरु असलेले--२२४१
  • बरे झालेले--६५६९
  • मृत्यू--३०५
  • आजचे मृत्यू - ९, 
  • आजचे पॉझिटीव्ह - ४१४

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur corona Update today 414 corona patient increase and nine death