
सोमवारी (ता.२०) ६८ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या एक हजार २२७ इतकी झाली आहे. दरम्यान कोरोनावर मात केल्याने ५५ नागरीकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
लातूर : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. यात सोमवारी (ता.२०) ६८ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या एक हजार २२७ इतकी झाली आहे. दरम्यान कोरोनावर मात केल्याने ५५ नागरीकांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गेल्या दोन दिवसातील ४३२ रुग्णांचे अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.
Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम
जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढत चालला आहे. दररोज ५० पेक्षा अधिक रुग्ण समोर येत आहेत. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णांच्या स्वॅबची तपासणी केली जात आहे. यात सोमवारी (ता.२०) ६८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एक हजार २२७ झाली आहे. यात ६३५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर ५३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..!
दरम्यान सोमवारी ५५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. यात बारा नंबर पाटी येथील वसतिगृहातील कोविड केअर सेंटरमधील १६, निलंग्याच्या कोविड केअर सेंटरमधील चार, उदगीरच्या सामान्य रुग्णालयातील चार, निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयातील एक, उदगीरच्या कोविड केअर सेंटरमधील एक, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील २६ तर चाकूरच्या तीन रुग्णांचा यात समावेश आहे.
ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...
(संपादन प्रताप अवचार)