SSC NEWS : काय सांगता..! कोकण नव्हे लातूर राज्यात सर्वाधिक अव्वल विभाग, तो कसा वाचा सविस्तर..!  

संग्रहीत फोटो.jpg
संग्रहीत फोटो.jpg

लातूर : दहावीच्या एकूण निकालात कोकण विभागीय मंडळ अव्वल ठरले असले तरी आणखी एका बाबतीत लातूर विभागीय मंडळ राज्यात अव्वल ठरले आहे. ते म्हणजे या परीक्षेत शतक झळकावणारे विद्यार्थी. लातूर विभागीय मंडळातील तब्बल १५१ विद्यार्थी यंदा ‘शतकवीर’ ठरले आहेत. त्यामुळे ‘लातूर पॅटर्न’चा झेंडा आणखी उंचावर गेला आहे. शतक गाठणाऱ्या या विद्यार्थ्यांवर सध्या राज्यभरातून कौतूकाचा वर्षाव होत आहे.

कोरोनामुळे दहावीच्या परीक्षेचा निकाल काहीसा लांबला. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबर पालकांचेही या निकालाकडे लक्ष लागले होते. अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने निकालाची तारीख आणि वेळ जाहीर केल्याने किती गुण मिळणार, याची अनेकांना उत्सुकता होती. अखरे निकाल जाहीर झाल्यानंतर लातूर विभागीय मंडळातील तब्बल १५१ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवल्याचे समोर आले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी केवळ लातूर विभागीय मंडळात असल्याने दिसून येत आहे. यात लातूर जिल्यातील तब्बल १२९ तर उस्मानाबादमधील १९ तर नांदेडमधील ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मागील वर्षी शंभर पैकी शंभर गुण घेणारे राज्यात केवळ २० विद्यार्थी होते. पण यंदा ही आकडेवारी चांगलीच वाढली आहे. शंभर पैकी शंभर गुण घेणारे राज्यात २४२ विद्यार्थी आहेत. त्यात लातूरमधील १५१, औरंगाबादमधील ३६, कोल्हापूरमधील १५, अमरावतीमधील १२, पुण्यातील १२, नागपूरमधील ३ आणि मुंबईतील २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. नाशिकमध्ये मागील वर्षाप्रमाणेच यंदाही एकाही विद्यार्थ्याला शंभरपैकी शंभर गुण मिळवता आले नाहीत. २०१७ मध्ये राज्यातील १९३ विद्यार्थ्यांनी तर २०१८ मध्ये १२५ विद्यार्थ्यांनी शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळवले होते, अशी माहिती मंडळातर्फे जाहीर करण्यात आली.

असे आहेत शतकवीर

  • विभागीय मंडळ :  मागील वर्षी   :  यंदा
  • लातूर :                            १६  : १५१
  • औरंगाबाद :                      ३  : ३६
  • कोल्हापूर :                        ०  : १५
  • अमरावती :                        १  : १२
  • पुणे :                                 ० : १२
  • कोकण :                            ० : ११
  • नागपूर :                            ० : ३
  • मुंबई :                               ० : २
  • नाशिक :                            ० : ०
  • एकुण :                             २० : २४२

Edited by Pratap Awachar
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com