
बारावीच्या पुरवणी परीक्षेत लातूर विभाग तिसऱ्या तर दहावी परीक्षेच्या निकालात चौथ्या क्रमांकावर आहे. दोन वर्षांच्या तुलनेत बारावीत लातूर विभागाचा निकाल दहा टक्क्यांनी घटला असून दहावीच्या निकालातही दोन टक्क्यांची घट झाली आहे.
लातूर : बारावीच्या पुरवणी परीक्षेत लातूर विभाग तिसऱ्या तर दहावी परीक्षेच्या निकालात चौथ्या क्रमांकावर आहे. दोन वर्षांच्या तुलनेत बारावीत लातूर विभागाचा निकाल दहा टक्क्यांनी घटला असून दहावीच्या निकालातही दोन टक्क्यांची घट झाली आहे. विभागात बारावीच्या निकालात लातूरने तर दहावीच्या निकालात उस्मानाबाद जिल्ह्याने आघाडी घेतली आहे.
परीक्षेला मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. मात्र, निकालात घट झाली आहे. बारावीचा लातूर विभागाचा निकाल २२.०५ टक्के तर दहावीचा निकाल ३३.५९ लागला आहे. बारावीच्या निकालात विभाग राज्यात तिसऱ्या तर दहावीच्या निकालात चौथ्या क्रमांकावर आहे. या स्थितीत बारावीच्या निकालात गत दोन वर्षांच्या तुलनेत दहा टक्क्यांनी तर दहावीचा निकाल दोन टक्क्यांनी घटला आहे.
बारावी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या चार हजार ५५ पैकी चार हजार २७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात केवळ ८८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीसाठी नोंदणी केलेल्या तीन हजार ६६४ पैकी तीन हजार ३८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील एक हजार १३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यातील सात विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर उर्वरित एक हजार १२९ विद्यार्थी पास श्रेणीत आहेत.
जिल्हानिहाय निकालाची टक्केवारी
बारावी ः लातूर २७.९३, नांदेड २१.३१, उस्मानाबाद जिल्ह्याचा १७.१२ टक्के निकाल आहे.
दहावी ः उस्मानाबाद ३९.७० टक्के, नांदेड ३२.६० टक्के तर लातूर जिल्ह्याचा निकाल ३०.१२ टक्के आहे.
Edited - Ganesh Pitekar