शरीराचे तुकडे तुकडे करून कूपनलिकेत कोंबले, मुंडके मात्र...

murder
murder

लातूर: लातूर तालुक्यातील मुरूड येथील आंबेडकर चौकातील एका ऑटोमोबाईल्स दुकानात मेकॅनिक असलेल्या युवकाचा दुकानमालक, त्याचा भाऊ व तीन मित्रांनी मिळून निघृण खून केल्याची घटना गुरूवारी (ता. 14) रात्री उघड झाली. खून केल्यानंतर युवकाच्या मृतदेहाचे तुकडे करून कूपनलीकेत (बोअर) टाकले तर धड व मुंडके कूपनलिकेत न गेल्याने ते उघड्यावर फेकण्यात आले.

दुकानमालकासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली असून सर्वांनी खूनाची कबूली दिली आहे. न्यायालयाने आज सर्वांना 19 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कृष्णा बबन उर्फ शिवाजी पांचाळ (वय 20, रा. दत्तनगर, मुरूड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. दुकानमालक सचिन शिवाजी गायकवाड (35), त्याचा भाऊ संदिप शिवाजी गायकवाड (30, दोघे रा. गुंफावाडी, ता. लातूर), शुभम बाळू इंगळे (20), आकाश अरूण शिंदे (23) व संदिप संजय समुद्रे (20, सर्व रा. मुरूड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पैशांच्या कारणावरून खून

संदीप समुद्रे हा कृष्णासोबतच मेकॅनिक म्हणून काम करत होता. पैशाची देवाणघेवाण, कृष्णा हा दुसरे दुकान सुरू करणार असल्याच्या कारणावरून हा प्रकार झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी अन्य काही कारणे आहेत का, याचा पोलिस शोध घेत आहेत. 


पोलिसांनी सांगितले, की आंबेडकर चौकातील सचिन गायकवाड याच्या "सचिन ऑटोमोबाईल्स' दुकानात कृष्णा पांचाळ चार वर्षापासून मेकॅनिक आहे. आठ नोव्हेंबरला रात्री मालकासोबत येरमाळा येथे महत्वाच्या कामानिमित्त जात असल्याचे भावाला सांगून तो बेपत्ता झाला. शोधूननही तो सापडला नाही. यामुळे वडीलांच्या माहितीवरून पोलिसांनी कृष्णा बेपत्ता झाल्याची नोंद केली.

कृष्णा बेपत्ता होण्यामागे दुकानमालक सचिनचा हात असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला, बेपत्ता झाल्याच्या दिवशी तो कृष्णासोबतच असल्याचे पुरावे दाखवले. त्यानंतर पोलिसांनी गुरूवारी सचिनला ताब्यात घेऊन चौकशी केली. यात सचिनने भाऊ व तीन मित्रांच्या मदतीने कृष्णाचा खून केल्याची कबूली देत कृष्णाच्या मृतदेहाचे तुकडे करून तावरजखेडा (ता. उस्मानाबाद) येथील मेहुण्याच्या शेतातील कूपनलिकेत तसेच शेतात टाकल्याचे सांगितले. 

 उभे राहा आणि वजन कमी करा
हातपाय अजूनही कुपनलिकेतच 
पाच जणांनी मिळून कृष्णाला आठ नोव्हेंबरच्या रात्री कारमधून तेर व अन्य ठिकाणी नेले. तत्पूर्वी त्याला खूप दारू पाजवली. वाणेवाडीजवळ त्याचा गळा आवळून खून केला. मृतदेह तावरजखेडा शिवारात आणून ऊसाच्या कोयत्याने त्याचे तुकडे केले. ते कूपनलिकेत टाकण्याचा सर्वांचा इरादा होता. मात्र, कूपनलिकेत केवळ हातपाय गेले. धड, मुंडके बाजूच्या बांधावर फेकले. पोलिसांनी आज दिवसभर बोअरमधून हात, पाय काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते सापडले नाहीत. शनिवारी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत. दुसऱ्या कूपनलिकेतून कृष्णाचे कपडे काढण्यात पोलिसांना यश आले आहे. 

आयुष्यमान खुराना : सलग सात सुपरहिट सिनेमे देणारा बॉलिवूडचा 'रायझिंग सुपरस्टार'
दुकानाची तोडफोड 
कृष्णाच्या खूनाचा उलगडा झाल्यानंतर नातेवाईक संतप्त झाले. यातूनच काहींनी शुक्रवारी सकाळी संशयित आरोपी सचिन गायकवाड याच्या "सचिन ऑटोमोबाईल्स'ची तोडफोड केली. तेथे दुरूस्तीसाठी आलेल्या दुचाकी जाळण्याचा प्रयत्न केला. दुकान उघडून तेही जाळण्याचा प्रयत्न सुरू असतानाच पोलिसांचे वाहन आल्याने सर्व पळाले.

या घटनेनंतर पोलिस उपअधीक्षक (गृह) भीमाशंकर हिरमुखे यांनी घटनास्थळी माहिती घेतली. दरम्यान, युवकाच्या खूनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कृष्णाच्या मृतदेहाचे काही अवशेष जमा करून लातूरला उत्तरीय तपासणीसाठी पाठवल्याचे सहायक पोलिस निरीक्षक टी. आर. भालेराव यांनी सांगितले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्यासह अधिकारी व पोलिस गुरूवारी काल रात्रभर येथे होते.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com