Corona Breaking : लातूरचा कोरोना हजाराच्या उंबरठ्यावर, तर कोरोना बळींची संख्या झाली एवढी..

हरी तुगावकर
Friday, 17 July 2020

 कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊऩच्या सुरुवातीचे काही महिने शांत असलेल्या लातूर जिल्हयात अवघ्या एक दीड महिन्यात कोरोनाचा विळखा वाढला आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या उंबरठ्यावर आहे.

लातूर : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊऩच्या सुरुवातीचे काही महिने शांत असलेल्या लातूर जिल्हयात अवघ्या एक दीड महिन्यात कोरोनाचा विळखा वाढला आहे. लातूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एक हजाराच्या उंबरठ्यावर आहे. गुरुवारी (ता. १६) जिल्ह्यातील ८४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या ९९३ झाली आहे. तर आतापर्यंत ४८ जणांचा मृत्यू झाला आहे.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरुवात झाल्यापासून जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय वाढ होत चालली आहे. त्यात गेल्या आठ दहा दिवसात तर ही संख्या वाढत चालली आहे. त्यात गुरुवारी तर यात उच्चांक गाठला. या दिवशी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत ४८१ नमुने तपासणीसाठी आले होते. त्या पैकी ३१६ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर ८४ जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ६२ जणांच्या नमुन्यांची पुर्नतपासणी केली जाणार आहे. तर १९ जणाचे नमुने नाकारण्यात आले आहेत. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

आजच्या अहवालातील ८४ पैकी ७३ रुग्ण हे पॉझिटीव्ह व्यक्तींच्या संपर्कातील आहेत. तर ११  रुग्ण हे नव्याने आढळून आले आहेत. आजच्या ८४ रुग्णामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ९९३ झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्हा हजार रुग्ण होण्याच्या उंबरठ्यावर आहे. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

या भागातील रुग्णसंख्या 

यात उदगीर शहरातील १४०, उदगीर तालुक्यातील ६०, जळकोट तालुक्यातील चार, निलंगा शहरातील ६२, निलंगा तालुक्यातील ६०, लातूर शहरातील ३७५, लातूर तालुक्यातील ६३, अहमदपूर शहरातील ३५, अहमदपूर तालुक्यातील ३४, चाकूर शहरातील सात, चाकूर तालुक्यातील १५, रेणापूर शहरातील एक, रेणापूर तालुक्यातील आठ, औसा शहरातील ४५, औसा तालुक्यातील ५१, शिरुर अनंतपाळ तालुक्यातील एक, देवणी तालुक्यातील २९ रुग्णाचा समावेश आहे. या मध्ये शहरी भागातील ६७० तर ग्रामीण भागातील ३२३ रुग्णांचा समावेश आहे. 

बेडूक अन् उंदरांवर चालते त्यांची उपजीविका  

६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

दरम्यान गुरुवारी येथील सराफ लाईनमधील ६३ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तसेच शुक्रवारी (ता. १७) येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत भाग्यनगर भागातील ६८ वर्षीय महिलेचा, देवणी येथील कोविड केअर सेंटरमध्ये विळेगाव (ता. देवणी) येथील ६५ वर्षीय महिलेचा तर उदगीरच्या सामान्य रुग्णालयात उदगीरच्या अशोकनगर भागातील ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोनाचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या ४८ झाली आहे. त्यामुळे मृतांचा आकाडा आता ५० च्या घरात चालला आहे.

( संपादन : प्रताप अवचार )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur Today corona Update 84 new corona patient