esakal | Video : बारामतीची पालखी वाहून मोठं व्हायचं नाही : महादेव जानकर
sakal

बोलून बातमी शोधा

Beed News

मी भाजपचा नाही, माझ्या पक्षाचाच आहे... ज्या पक्षानं नेतृत्व दिलं, मुंडे साहेबांना दिल्लीपर्यंत नेण्याचं काम केलं, त्या पक्षाच्या नेत्यांचा अपमान हा आपल्या पंकजा ताईंचा अपमान आहे... शिव्या जरी दिल्या, मारलं जरी, तरी आपल्याला ह्यांच्या बरोबरच जायचं आहे, असं जानकर म्हणाले. 

Video : बारामतीची पालखी वाहून मोठं व्हायचं नाही : महादेव जानकर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बीड : स्वतःची ओळख पंकजा मुंडे यांचे बंधू, असं सांगणाऱ्या महादेव जानकर यांनी मात्र बहिणीचा कळवळा घेत इथून पुढे अशी वागणूक देऊ नका, अशी भावनिक साद भाजप प्रदेशाध्यध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना घातली. दुसऱ्याच्या घरी जाऊन आम्हाला मोठं व्हायचं नाही. बारामतीची पालखी वाहून मोठं व्हायचं नाही, असं विधानही श्री. जानकर यांनी केलं. 

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त परळी परिसरातील पांगरी येथील गोपीनाथगडावर अभिवादन कार्यक्रम पार पडला. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासह इतर वरिष्ठ नेते आणि मोठा जनसमुदाय उपस्थित होता. या नेत्यांच्या भाषणांबरोबरच माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे महादेव जानकर, बबनराव लोणीकर, पाशा पटेल यांचीही भाषणे सुरवातीला झाली. 

माझ्या बापाचा पक्ष, असं कोण म्हणालं?

विधानसभा निवडणूकीत पराभव झाल्यापासून राज्याच्या राजकीय वर्तूळात चर्चेत असलेल्या पंकजा मुंडे आणि पक्षाने तिकीट कापल्यापासून नेतृत्वाच्या विरोधात धारदार विधाने करणारे एकनाथ खडसे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच या नेत्यांची भाषणेही चांगलीच गाजली. कार्यकर्तेही टाळ्या, शिट्ट्या वाजवून विधानांना दाद देत होते. ''दादा, आमची नियत साफ आहे. पण तुम्ही त्रास देता हे मान्य करावे लागेल. आम्ही तुमच्यासोबतच राहू, पण त्रास देऊ नका,'' असा टोलाही महादेव जानकर यांनी लगावला. 

मशाल घेऊन राज्यभर फिरणार

पंकजा मुंडे या भाजपच्या सिंघम आहेत, असं विधान भाजपचे बबनराव लोणीकर यांनी केलं. आगामी निवडणुकीत त्या 50 हजार मतांनी निवडून येतील, इतकंच नव्हे तर पंकजा मुंडे या भविष्यात मोठं राजकीय नेतृत्व करणार आहेत, असंही ते म्हणाले. एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर आवाज उठवत सभागृह दणाणून सोडणाऱ्या राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी ''ताई आपण संघर्ष करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत,'' असे म्हणत पाठिंबा दर्शविला.

पंकजा मुंडे करणार औरंगाबादला उपोषण

विधानसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर पुन्हा सत्तेत मोठं पद मिळण्याची चर्चा असणारे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे बोलायला उभे राहिल्यानंतर उपस्थितांच्या भुवया उंचावल्या होत्या, मात्र त्यांनी 'वेगळे' विधान न करता केवळ गोपीनाथ मुंडे आठवणींना उजाळा दिला. एखाद्या पराभवाने पंकजा खचून जाणार नाहीत, त्यांना आणखी खूप दूर जायचं आहे, त्यांचं पक्षात महत्त्वाचं स्थान आहे, अशी वक्तव्ये त्यांनी केली.

फक्त मुंडे स्मारकासाठीच फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले

यावेळी उपस्थित एकनाथ खडसे यांनी 'महादेव जानकारांना कुणीतरी छळतंय' असं व्यक्तव्य केल्याने उपस्थितांमध्ये काही काळ हशा पिकला. गोपीनाथ गडाच्या व्यासपीठावरुन "भाजपला बहुजनांचा चेहरा देण्याचं काम मुंडे साहेबांनी केलं, दुसरा पक्ष काढावा का?'' असा प्रश्‍न कार्यकर्त्यांना उद्देशून केल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच गलका केला.