जालना जिल्ह्यात लॉकडाऊनमुळे महानुभाव आश्रम अडचणीत 

दिलीप दखने 
Saturday, 25 April 2020

महानुभाव आश्रमातील साधक गावात जाऊन ज्वारी, गहु आदी अन्नधान्याचे संकलन करत असतात. मात्र सध्या लॉकडाऊन असल्याने साधकांना आश्रमाच्या बाहेर पडणे अशक्य बनले आहे. 
त्यामुळे आश्रमातील अन्नधान्य साठाही संपल्‍यात जमा आहे. आश्रमात अनेक साधक वयोवृद्ध आहेत, त्यांच्या आरोग्याचाही प्रश्‍न आहे

वडीगोद्री, (जि. जालना) -  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनसह संचारबंदी लागू असल्याने जिल्ह्यातील विविध महानुभाव पंथाचे आश्रम अडचणीत सापडले आहेत. आश्रमाच्या बाहेर पडणे अशक्य बनल्याने अन्नधान्य संकलनाचा प्रश्‍न निर्माण झालेला आहे. 

जिल्ह्यात जाळीचा देव, बदनापूर, ढाकेफळ, काजाळा, जालन्याचे श्री दत्त मंदिर, वनदेव मंदिर , अंबडचे कृष्ण मंदिर अंतरवाली सराटीचे चक्रधर मंदिर , कृष्ण मंदिर असे विविध जवळपास  २५ आश्रम आहेत.

हेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील 

या ठिकाणी आश्रमात जवळपास दोन हजार महिला-पुरूष साधु वास्तव्यास असतात. सध्या कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर योग्य ती खबरदारी घेत साधू भक्ती व नामस्मरण करत आहेत, असे अखिल भारतीय महानुभाव साहित्य मंडळाचे कोषाध्यक्ष महंत श्री प्रज्ञासागर बाबा खनेपुरीकर यांनी सांगितले.

हेही वाचा : कोरोनामुक्तीच्या लढ्यासोबत जनतेची काळजी 

महानुभाव आश्रमातील साधक गावात जाऊन ज्वारी, गहु आदी अन्नधान्याचे संकलन करत असतात. मात्र सध्या लॉकडाऊन असल्याने साधकांना आश्रमाच्या बाहेर पडणे अशक्य बनले आहे. 
त्यामुळे आश्रमातील अन्नधान्य साठाही संपल्‍यात जमा आहे. आश्रमात अनेक साधक वयोवृद्ध आहेत, त्यांच्या आरोग्याचाही प्रश्‍न आहे. त्यामुळे दानशुरांसह प्रशासनाने आश्रमांना अन्नधान्यासह वैद्यकीय मदत करणे अपेक्षित आहे. 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून महानुभाव पंथाचे आश्रमात खबरदारी घेतली जात आहे. आश्रम सध्या भाविकांसाठी बंद आहेत. येथील साधू मास्क, रुमालाचा वापर करीत आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. सुरक्षीत अंतर ठेवत नामस्मरण करण्यात येत आहे, असे महंत श्री प्रज्ञासागर बाबा यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahanubhav ashram in trouble in Jalna