esakal | एकेकाळी शरद पवारांचे खंदे समर्थक असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटीलांच्या नातवाची पार्थच्या समर्थनार्थ पोस्ट. म्हणाले...  
sakal

बोलून बातमी शोधा

part pawar.jpg

डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यानी पार्थला तुम्ही जन्मतःच फाईटर असल्याचे म्हटले आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर एकेकाळच्या सहकाऱ्यांच्या नातवाकडून प्रतिक्रिया आल्याने जिल्ह्यामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

एकेकाळी शरद पवारांचे खंदे समर्थक असलेल्या डॉ. पद्मसिंह पाटीलांच्या नातवाची पार्थच्या समर्थनार्थ पोस्ट. म्हणाले...  

sakal_logo
By
तानाजी जाधवर

उस्मानाबाद : राज्यात सध्या पार्थ पवार चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याचे कारणही तसच आहे. स्वतः आजोबा शरद पवार यांनी पार्थ यांना अपरिपक्व असल्याचे जाहीरपणे बोलुन दाखविले होते.

औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला... 

पण त्यांच्या आजोळात म्हणजे डॉ. पद्मसिंह पाटील यांचे नातू मल्हार पाटील यानी पार्थला तुम्ही जन्मतःच फाईटर असल्याचे म्हटले आहे. जेष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर एकेकाळच्या सहकाऱ्यांच्या नातवाकडून प्रतिक्रिया आल्याने जिल्ह्यामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

तुम्ही जन्मत: फायटर आहात आणि मी ते लहानपणापासून पाहिलं आहे. मला तुमचा अभिमान आहे. आपण उस्मानाबादचे आहोत आणि लढायचं कसं हे आपल्याला माहित आहे. अशी पोस्ट मल्हार पाटील यानी त्यांच्या फेसबुकवर टाकली आहे. मल्हार पाटील यांच्या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश

डॉ.पद्मसिंह पाटील व शरद पवार यांच्यात असलेले मैत्रीचे किस्से आजही जिल्ह्यामध्ये चर्चेले जातात. शिवाय त्यांच्यामध्ये नातेसंबध तेवढेच जवळचे राहिलेले आहेत. 
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या डॉ.पद्मसिंह पाटील यांच्या बघिणी आहेत. नात्याने डॉ. पाटील हे पार्थचे मामा लागतात. डॉ. पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी पार्थ यांची बाजु घेतल्याने ते चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यांच्या या प्रतिक्रिये करण्याचा  विचार केला तर ते नातेसबंधापेक्षा राजकीयच अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकी अगोदर आमदार राणा जगजितसिंह पाटील यानी शरद पवार व राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याचे राज्याने पाहिले होते. सध्याच्या स्थितीला पार्थ पवार याच्या हालचालीकडे लक्ष दिल्यास ते भाजपकडे झुकल्याचे बोलले जात आहे. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

शिवाय त्याचवेळी स्वतः शरद पवारांनी नातवाला फटकारले होते. अगदी हीच वेळ साधुन मल्हार पाटील यांनी आपल्या काकाचे (पार्थचे) समर्थन केल्याचे दिसुन येत आहे. यामुळे एकेकाळी राज्याच्या राजकारणात शरद पवार व डॉ. पद्मसिंह पाटील यानी राजकीय शत्रुंना नामोहरम केले होते. आता त्यांची तिसरी पिढी मात्र वेगळ्याच भुमिका घेऊन चर्चेला येत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

मध्यरात्री जिल्हाधिकारी कोवीड वॉर्डात घुसतात तेव्हा... 

(संपादन-प्रताप अवचार)