कपडे धुण्यासाठी गेलेला व्यक्ती मांजरा नदीपात्रात बुडाला, शोधकार्य सुरु 

0Manjra nadipatr.jpg
0Manjra nadipatr.jpg

कळंब (उस्मानाबाद) : कळंब तालूक्यातील सात्रा येथील मांजरा नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या 42 वर्षीय व्यक्ती पाय घसरून नदी पात्रात वाहून गेला आहे. ही दुदैवी घटना मंगळवार (ता.२०) दुपारी दोनच्या सुमारास घडली आहे. दरम्यान महसूल विभागाचे पथक गेल्या तीन तासांपासून वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहे. परंतु मांजरा नदीला मोठ्या प्रमाणात वाहत्या पाण्याचा जोर व वेग असल्याने महसूलच्या यापथकाने शोधकार्य थांबवले आहे. 


सात्रा येथील बंडू केरबा गालफडे (वय-४२) हे कुटुंबासह गावाजवळील मांजरा नदीवर दसऱ्यानिमित्त कपडे धुण्यासाठी गेले होते. नदीच्या काठावर कपडे धुतं असताना बंडू यांचा पाय घसरला. कुटुंबातील सदस्यांनी आरडा ओरडा केला पण जवळपास तेथे कोण उपस्थित नव्हते. घडलेल्या घटनेबद्दल गावातील काही नागरिकांना ही माहिती तलाठी डी व्ही शिरसेवाढ याना माहिती दिली.

तलाठी शिरसेवाढ यांनी घडलेल्या दुर्देवी घटनेबद्दल तहसीलदार मंजुषा लटपटे याना दिली. तहसीलदारसह महसूलचे पथक अत्यावश्यक सुविधासह मांजरा नदीवर दाखल होऊन वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण पाण्याचा प्रवाह जोराचा आहे. हे पाणी थेट मांजरा प्रकल्पाला मिळत आहे. जोराचे पाणी वाहत असल्याने महसूलच्या पथकाला वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध लावण्यास अडचणी आल्या. त्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. हे शर्यतीचे प्रयत्न पथकाने तीन तास सुरू ठेवले पण यश आले नाही. यावेळी तहसीलदार मंजुषा लटपटे, मंडळधिकारी श्री भिसे, पोलीस कर्मचारी, गावातील नागरिक उपस्थित होते.

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com