esakal | ‘मांजरा’ दोनदा भरेल इतके पाणी गेले कर्नाटकात 
sakal

बोलून बातमी शोधा

Manjra dam.jpg

५४० दशलक्षघनमीटर सोडले पाणी; पाणी वळविण्यासाठी हवेत प्रयत्न 

‘मांजरा’ दोनदा भरेल इतके पाणी गेले कर्नाटकात 

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर :  लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा धरणाच्या पाणलोट पेक्षा खालच्याच बाजूला पाऊस जास्त पडत आहे. यावर्षीदेखील तसाच प्रकार घडला. सध्या मांजरा नदीचे १४५ किलोमीटरचे पात्र पाण्याने भरले आहे. पण, पाऊस जास्त झाल्याने ५४० दशलक्षघनमीटर पाणी कर्नाटकात सोडून द्यावे लागले आहे. एवढ्या पाण्यात मांजरा धरण दोनदा भरून ओव्हर फ्लो होऊ शकले असते. त्यामुळे अतिपाऊस झाल्यानंतर कर्नाटकात वाहून जाणारे पाणी लातूर जिल्ह्यात कसे वळवता येईल याचा अभ्यास करून प्रयत्न करण्याची गरज आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मांजरा धरणाच्या खाल्या बाजूला दरवर्षी चांगला पाऊस पडत आहे. यावर्षीही तशीच परिस्थिती राहिली. परतीचा पाऊसही चांगला झाला. त्यामुळे मांजरा नदीवरील १५ बॅरेजेस ओव्हरफ्लो झाले. १४५ किलोमीटर मांजरा नदीचे पात्रात सध्या ६०.३७ दशलक्षघनमीटर पाणी राहिले. तशीच परिस्थिती तेरणा नदीची आहे. या नदीवरील सात बॅरेजेस शंभर टक्के भरले. या बॅरेजेसच्या माध्यमातून ७० किलोमीटर नदीच्या पात्रात ९.७२ दशलक्षघनमीटर पाणी थांबले गेले. रेणा नदीवरील तीन बॅरेजेस शंभर टक्के भरल्याने १९ किलोमीटरच्या नदीच्या पात्रात ०.६० दशलक्षघनमीटर पाणी थांबू शकले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 पाणी जाते कर्नाटकात वाहून 
दरवर्षी मांजरा तसेच तेरणाच्या नदीच्या पट्ट्यात चांगला पाऊस झाल्यानंतर ही बॅरेजेस भरली जात आहेत. त्यानंतर पाणी खाली कर्नाटकात सोडून देण्याची वेळ येते. यावर्षीदेखील ५४० दशलक्षघनमीटर पाणी सोडून द्यावे लागले आहे. यात मांजरा नदीवरील होसूर बॅरेजेसमधून २९५.७० व तेरणा नदीवरील तगरखेडा बॅरेजेसमधून २४४.४० दशलक्षघनमीटर पाणी खाली सोडून द्यावे लागले आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कार्यालय आले आता हवा अभ्यास 
एकीकडे मांजरा धरणात पाणी नसते तर या बॅरेजेसमधून पाणी सोडून देण्याची वेळ येते. धरणाची पाणी साठवण क्षमता २१४.३७ दशलक्षघनमीटर आहे. यावर्षी कर्नाटकात सोडून दिले गेलेले पाणी ५४० दशलक्षघनमीटर आहे. त्यामुळे हे धरण दोनदा भरेल इतके पाणी खाली सोडावे लागले आहे. पालकमंत्री अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख यांच्या पुढाकारातून येथे लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यालय आले आहे. कर्नाटकात वाहून जाणारे पाणी लातूर जिल्ह्यात कसे वळवता येईल याचा अभ्यास प्राधिकरणाने करण्याची गरज आहे. बॅरेजेसे ओव्हरफ्लो झाल्यानंतर त्या परिसरातील मध्यम, लघू प्रकल्पात हे पाणी घेता येवू शकते का? याचाही विचार होण्याची गरज आहे. 
 
आकडे बोलतात क्षमता (दलघमी)

 • नाव-     पाणीसाठा -आजचा ---टक्केवारी 
 • लासरा      ३.००         १.१३-   ४०.१४ 
 • अंजनपूर   १.५०        १.१२-    -७४.८० 
 • टाकळगाव १.९२-      १.४९--  -७७.८२ 
 • वांजरखेडा  ३.६०       ३.६००   -१००.०० 
 • वांगदरी   ०.८४-       ०.८४       -१००.०० 
 • कारसा पोहरेगाव ३.४१    ३.४१- १००.०० 
 • नागझरी   ३.४८        ३.४८-       १००.०० 
 • साई  ३.४७               ३.४७      १००.०० 
 • खुलगापूर ९.७२        ९.७२          १००.०० 
 • शिवणी ९.८१          ९.८१            १००.०० 
 • बिंदगीहाळ १.३५     १.३५-      १००.०० 
 • भुसणी १.४९          १.४९-        १००.०० 
 • डोंगरगाव ७.९०     ७.९०-     १००.०० 
 • धनेगाव ११.३१       ९.२८--     ८२.११ 
 • होसूर  २.२५         २.२५-       १००.०० 
 • एकूण-- ६५.०५     ६०.३७  ९२.८१

(Edited By Pratap Awachar)