esakal | मराठा सेवा संघ मोठे वैचारिक संघटन : संभाजीराजे छत्रपती
sakal

बोलून बातमी शोधा

sanbhajiraje bhosale.jpg

आरक्षणासाठी पाठपुरावा करणार 

मराठा सेवा संघ मोठे वैचारिक संघटन : संभाजीराजे छत्रपती

sakal_logo
By
हरी तुगावकर

लातूर  : ‘‘मराठा सेवा संघ ही राज्यातील सर्वांत मोठी वैचारिक संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षणासाठी गेल्या ३० वर्षांपासून लढा सुरू आहे. शासकीय पातळीवर संसदेमध्ये मराठा आरक्षणासाठी लढा उभा करण्याचे काम मराठा सेवा संघाने केलेले आहे. त्यामुळे या संघटनांच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी अखेरपर्यंत पाठपुरावा करणार आहे’’, असे मत खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी येथे व्यक्त केले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी ते येथे आले होते. यावेळी मराठा सेवा संघाच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला मराठा सेवा संघाचे माजी जिल्हाध्यक्ष विद्याधर कांदे, माजी सचिव विजयकुमार औंढे, अभियंता चंद्रसेन नाना लोंढे, उद्योजकता कक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष हंसराज जाधव, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्य वैशाली यादव, डॉ. अभय कदम मराठा सेवा संघाचे कार्याध्यक्ष अनंत सूर्यवंशी, उपाध्यक्ष खंडेराव गंगणे, उपाध्यक्ष आम्रपाली सुरवसे, सहसचिव अमरदीप गुंजोटे, शहराध्यक्ष पृथ्वीराज पवार, प्रवीण देशमुख, अ‍ॅड. माधव सूर्यवंशी, अ‍ॅड. शिवकुमार जाधव, निखिल मोरे, ऋषी कदम, राणा चव्हाण, सुनील पाटील, अमोल पाटील उपस्थित होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुनील नावाडे यांनी संभाजी राजे छत्रपती यांच्यासमोर मराठा समाजाच्यावतीने विधायक मागण्या मांडल्या. यामध्ये मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विशेष योजना जाहीर केल्या जाव्यात, मराठा समाजातील मुलींसाठी शासकीय वसतिगृहाची निर्मिती करण्यात यावी; तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मराठा सेवा संघाचे सचिव संभाजी नवघरे यांनी मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने आणलेली स्थगिती उठविण्यासंदर्भात केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून स्वतंत्र अधिनियम करावा आणि संभाजी राजे छत्रपती यांनी घेतलेल्या भूमिकेसाठी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी पाठिंबा द्यावा, अशी भावनाही त्यांनी व्यक्‍त केली. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)