औरंगाबाद पदवीधर निवडणुकीतून आठ उमेदवारांचे अर्ज बाद, ३१ उमेदवार पात्र 

माधव इतबारे
Friday, 13 November 2020

४५ अर्ज ठरले वैध; ३१ उमेदवार पात्र 

औरंगाबाद : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूकीसाठी दाखल अर्जांची शुक्रवारी (ता. १३) छाननी करण्यात आली. त्यात एकूण ५३ पैकी ४५ अर्ज वैध ठरले असून, आठ अर्ज बाद झाले. यात भाजपतर्फे अर्ज दाखल केलेले प्रवीण घुगे यांचाही अर्ज बाद ठरला आहे.
 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

औरंगाबाद पदवीधर निवडणुकीसाठी ३९ उमेदवारांनी ५३ अर्ज दाखल केले होते. या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यात शिरिष बोराळकर (भाजप, औरंगाबाद), सतीश भानुदासराव चव्हाण (राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, औरंगाबाद), अब्दुल रऊफ (समाजवादी पार्टी, औरंगाबाद), अंकुशराव शिवाजीराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी, लातूर), कुणाल गौतम खरात (एमआयएम, औरंगाबाद), सचिन राजाराम ढवळे (प्रहार जनशक्ती पक्ष, औरंगाबाद), प्रा. नागोराव काशीनाथ पांचाळ ( वंचित बहुजन आघाडी, परभणी), डॉ. रोहित शिवराम बोरकर (आम आदमी पार्टी, पुणे), शे. सलीम शे. इब्राहिम (वंचित समाज इन्साफ पार्टी, परभणी), सचिन अशोक निकम (रिपब्लिकन सेना, औरंगाबाद), अशोक विठ्ठल सोनवणे (अपक्ष, औरंगाबाद), अॅड. प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर (अपक्ष, नांदेड), अक्षय नवनाथराव खेडकर (अपक्ष, औरंगाबाद), आशिष अशोक देशमुख (अपक्ष, बीड), ईश्वर आनंदराव मुंडे (अपक्ष, बीड), उत्तम बाबूराव बनसोडे (अपक्ष, नांदेड), अंभोरे शंकर भगवान (अपक्ष, औरंगाबाद), काजी तसलीम निजामोद्दीन (अपक्ष, उस्मानाबाद), कृष्णा दादाराव डोईफोडे ( अपक्ष, औरंगाबाद), अॅड. गणेश नवनाथ करांडे (अपक्ष, बीड), राणी रवींद्र घाडगे (अपक्ष, बीड), जयसिंगराव गायकवाड पाटील (अपक्ष, औरंगाबाद), दिलीप हरिभाऊ घुगे (अपक्ष, हिंगोली), रमेश शिवदास पोकळे (अपक्ष, बीड), प्रवीणकुमार विष्णू पोटभरे (अपक्ष, बीड), भारत आसाराम फुलारे (अपक्ष, औरंगाबाद), अॅड. शवंत रामभाऊ कसबे (अपक्ष, परभणी), रमेश साहेबराव कदम (अपक्ष, नांदेड), राम गंगाराम आत्राम (अपक्ष, लातूर), वसंत संभाजी भालेराव (अपक्ष, औरंगाबाद), विजेंद्र राधाकृष्ण सुरासे (अपक्ष, जालना), विलास बन्सीधर तांगडे (अपक्ष, जालना), डॉ. विलास गोवर्धन जगदाळे (अपक्ष, औरंगाबाद), विवेकानंद शशीकांत उजळंबकर (अपक्ष, लातूर), विशाल उद्धव नांदरकर (अपक्ष, औरंगाबाद), अॅ्ड. शरद बहिणाजी कांबळे (अपक्ष, बीड), ॲड. शहादेव जानू भंडारे (अपक्ष, बीड), ॲड. शिरिष मिलिंद कांबळे (अपक्ष, बीड), शेख गुलाम रसूल कठ्ठु (अपक्ष, औरंगाबाद), शेख हाज्जू हुसेन पटेल (अपक्ष, औरंगाबाद), समदानी चॉदसाब शेख (अपक्ष, नांदेड), सिद्धेश्वर आत्माराम मुंडे (अपक्ष, बीड), संजय तायडे (अपक्ष, औरंगाबाद), संजय शहाजी गंभीरे (अपक्ष, बीड), संदीप बाबुराव कराळे (अपक्ष, नांदेड) यांचे अर्ज वैद्य ठरले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

भाजपला मिळाला दिलासा 
भाजपतर्फे प्रवीण घुगे यांनी अर्ज भरला होता. त्यांची बंडखोरी शमल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले पण श्री. घुगे यांचा अर्जच बाद ठरला आहे. तसेच अतुल राजेंद्र कांबळे, छाया सोनवणे, सुनील महाकुंडे, प्रदिप चव्हाण, विजयश्री बारगळ, बळीराम केंद्रे, शेख फेरोजमीया खालेद यांचे अर्जही बाद झाले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathwada graduate elections Eight candidates disqualified and 31 eligible