परभणी : सेलूत रविवारी मराठा बांधवांची मोटारसायकल रॅली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

चक्क क्रेनवरच झळकले चाळीस फुटी बॅनर...
मराठा क्रांती महामोर्चाची जाहिरात करणारे चाळीस फुट उंच असे भव्य बॅनर शहरातील टिळक पुतळ्यासमोर चक्क क्रेनवरच झळकल्याने सेलूकरांचे ते बॅनर आर्कषण ठरले आहे. बॅनरच एवढे मोठे तर रॅली आणि मोर्चा कसा असेल याबद्दल सोशल मिडियासह शहरातील नागरिकात चर्चा रंगली आहे.

सेलू : सध्या राज्यभर मुंबईतील राज्यव्यापी मराठा क्रांती महामोर्चाच्या जनजागृतीसाठी मराठा समाजातील तरूणी व महिलांच्या नेतृत्वात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे.

याच अनुषंगाने सेलू शहरात रविवारी (ता.६)  रोजी सकाळी दहा वाजता भव्य मराठा मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासुन या रॅलीची सुरूवात सकाळी दहापासून होणार असून पुढे काॅलेज रोड, बाबासाहेब मंदिर रोड, गणपती गल्ली, सुभेदार गल्ली, शेरे गल्ली, फुलारी गल्ली, तेली गल्ली, मारवाडी गल्ली, सारंग गल्ली, गोविंदबाबा चौक, जवाहर रोड, क्रांती चौक, नुतन रोड, जिंतूर नाका, बसस्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीचा समारोप होईल. या रॅलीत मराठा समाजाने सहकुटुंब सहभागी व्हावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.

चक्क क्रेनवरच झळकले चाळीस फुटी बॅनर...
मराठा क्रांती महामोर्चाची जाहिरात करणारे चाळीस फुट उंच असे भव्य बॅनर शहरातील टिळक पुतळ्यासमोर चक्क क्रेनवरच झळकल्याने सेलूकरांचे ते बॅनर आर्कषण ठरले आहे. बॅनरच एवढे मोठे तर रॅली आणि मोर्चा कसा असेल याबद्दल सोशल मिडियासह शहरातील नागरिकात चर्चा रंगली आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Web Title: Marathwada news Maratha rally in Parbhani