'मत्स्योदरी' मंदिर उघडा, मनसेचा मोर्चा; अंबड पोलिसांनी रो़खले प्रवेशद्वारावरच.  

बाबासाहेब गोंटे 
Saturday, 17 October 2020

  • कोरोना महामारीमुळे दक्षता, मंदिर व पोलिस प्रशासनाने काढली आंदोलकांची समजूत. 
  • तपसिलदारांना निवेदन देऊन आंदोलन घेतले मागे. 

अंबड (जि.जालना) : अंबड शहरातील मत्स्योदरी देवीचे मंदिर उघडण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी (ता.17) आंदोलन केले. घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी मनसेच्या मंदिर उघडण्याच्या पावित्र्याला पोलिसांनी विरोध दर्शविला. प्रवेशद्वारावरच रोखून कायदा हातात घेऊ नका, आपल्या भावनांचा आम्ही आदर करीत असल्याचे पोलिस व मंदिर प्रशासनाने सांगीतले.  

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

नवरात्रोत्सावाला सुरुवात होताच राज्यभरातील आदीशक्तींची मंदिरे खुले करावी अशी मागणी केली जात आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलने केली जात आहे. शुक्रवारी (ता.17) अंबड मनसेच्या पदाधिकार्यांनी मस्त्योदरी मंदिराकडे आपला मोर्चा वळविला. यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वारावरच पोलिसांनी पदाधिकार्यांना रोखले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर सध्या मंदिर खुले करु नये, गर्दी टाळावी आदी बाबीवर निर्बंध लावण्यात आले आहे. म्हणून यंदाचा नवरात्रोत्सव अंत्यत साध्या पद्धतीने धार्मिक कार्यक्रम करून मंदिर दरवाजे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे धार्मिक कार्यक्रम करता येणार नाही, असे आव्हान मंदिर संस्थान व पोलिस प्रशासनाने केल्यानंतर मनसेच्या वतीने आपल्या मागण्याचे लेखी निवेदन नायब तहसिलदार तथा संस्थानचे सचिव बाबुराव चंडोल, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांना देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बळीराम खटके, कृष्णा गोरे, पंडीत पाटील, अशोक आटोळे, अमोल पांढरे, भाऊसाहेब चाबुकस्वार, योगेश नागरे, विष्णु पुंड, नाहेद पटवा, गोपी घायाळ, शरद खरात, दत्ता वाघमारे, भगवान खंडांगळे, गजानन राठोड, किसमत अली आदींची उपस्थिती होती. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Matsyodari temple open Ambad MNS front