'जीएसटी’मुळे रासायनिक खताच्या किंमती झाल्या कमी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जुलै 2017

शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्र शासनाचे दुरध्वनी मदत केंद्र

नांदेड: गुडस अॅन्ड सर्व्हिस टॅक्स (जीएसटी) लागू होण्यापुर्वी खतावर एक टक्के उत्पादन शुल्क व पाच टक्के आधारीत कर लागू होता. एक जुलै पासून अनुदानीत रासायनिक खतावर सरसकट पाच टक्के जीएसटी लागू करण्यात आलेला आहे. त्यामुळे अनुदानीत रासायनकि खताच्या किंमती एक जुलैपासून कमी झालेल्या आहेत.

याबाबत खत विक्रेत्यांना तसेच खत कंपनी प्रतिनिधी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. सुधारित दर साठा भाव फलकावर प्रसिद्ध करणे याबाबतही कळविण्यात आले आहे, असी माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पंडित मोरे यांनी सांगितले.

किरकोळ, घाऊक खत विक्रेत्यांनी कमी झालेल्या दराबाबात ग्रेडनिहाय दर, दरफलकावर प्रदर्शित करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांना नवीन दराने खताची खरेदी करावी. खरेदी पावतीवर शेतकरी व विक्रेता या दोघांच्या स्वाक्षरी घेण्यात याव्यात शेतकऱ्यांनी खताच्या दरा बाबतीत असलेल्या तक्रारीसाठी प्रत्यक्ष, दुरध्वनी, ईमेल, एसएमएस व्दारे कृषि विभागाचा टाेल फ्री क्रमांकावर किंवा भरारी पथकाचे फ्लेक्स वरील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कृषि विकास अधिकारी पंडीत मोरे यांनी केले आहे.

सर्व खत विक्रेत्यांना ‘जीएसटी’साठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व खत विक्रेत्यांनी ‘जीएसटी’साठी नोंदणी करावी. खतावरील जीएसटी बाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्र शासनाने मदत दुरध्वनी क्रमांक दिलेला आहे. त्यांचा ०११-२६१०६८१७ असा आहे. त्याचा वापर करुन खतावरील जीएसटी बाबत शंका असल्यास प्रश्‍न विचारुन शंकानिरसन करण्यात यावे. सदरचा मदत क्रमांक केंद्र शासनाने fert.nic.in. या संकेत स्थळावर प्रसिध्द केलेला आहे. या व्यतिरिक्त केंद्र शासनाने सर्व साधारण जीएसटीबाबत येणाऱ्या शंकांचे निरसन करण्यासाठी केंद्र शासनाने दुरध्वनी क्रमांक मदत केंद्रे म्हणून जाहीर केलेले आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: nanded news gst and Reduce the cost of fertilizers