नांदेड : आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ मात्र एकाच विमानाचे उड्डाण

प्रल्हाद कांबळे
शनिवार, 8 जुलै 2017

विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून जवळपास चार पोलिस अधिकाऱ्यांसह ५५ पोलिस कर्मचारी कार्यरत असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन सैदाने यांनी सांगितले. त्यांच्यासोबतच खाजगी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत आहे.

नांदेड - गुरू गोविंदसिंगाच्या पावन भूमीत गुरू- ता- गद्दी या त्रिशताब्दी वर्षानिमित्त सन २००८ मध्ये नांदेड शहराचा कायापालट झाला. त्यातच गुरू गोविंदसिंग यांच्या नावाने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ बांधण्यात आले.

सुरवातीला येथून मंबई, दिल्ली, अमृतसर अशी विमानसेवा काही दिवस सुरू होती. परंतु नंतरच्या काळात ही सेवा टप्याटप्याने बंद झाली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उड्डाण या महत्वकांक्षी प्रकल्पाद्वारे पुन्हा नांदेडची विमानसेवा सुरू झाली. त्यातही विघ्न आल्याने नांदेड - मुंबई कनेक्टीविटी देण्याएेवजी ती नांदेड - हैद्राबाद अशी सुरू केली. या सेवेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे सागंण्यात येत आहे.

नांदेड शहर हे देशाच्या महत्वाच्या शहाराला विमानसेवेने जोडल्या गेलेले आहे. या ठिकाणचे विमानतळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्यात आले. या ठिकाणी नाईट लॅंडींगची व्यवस्था आहे. तसेच विमानाला लागणारे विंधन भरण्याची सुविधा आहे. सुरूवातीला येथून विमानसेवा सुरळीत सुरू होती. यामुळे शिख बांधवांसह अन्य धर्मीय सचखंड गुरूद्वाराचे दर्शन घेण्यासाठी येत होते. भाविकांची चांगली सेवा झाली होती. परंतु विमान कंपन्याना पाहिजे तेवढा महसुल मिळत नसल्याने हळु हळु वेगवेगळ्या कंपन्यांनी आपली सेवा खंडीत केली. कोट्यावधी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले हे विमानतळ बंद पडले. त्यावर होणारा खर्च सरकारला परवडत नसल्याने अखेर हे विमानतळ रिलायन्स या कंपनीला दुरूस्ती व देखभालीसाठी लीजवर दिले.

या ठिकाणाहून विमानसेवा सुरू व्हावी यासाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण व सचखंड गुरूद्वाराने प्रयत्न केले. परंतु प्रवाशी संख्या पाहिजे तेवढी मिळत नसल्याने कंपन्यांकडून नकार घंटा मिळत होती. अखेर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी देशात ऊड्डाण हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला. व त्यात नांदेड शहराला सामावून घेतले. सुरूवातीला नांदेड- मुंबई व नांदेड- हैद्राबाद अशी सेवा सुरू होणार होती. परंतु मुंबई एेवजी ट्रुजेट या कंपनीने नांदेड - हैद्राबाद अशी सेवा सुरू केली. त्या सेवेलाही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे बोलल्या जाते.

विमानतळावर सुरक्षेच्या दृष्टीकोणातून जवळपास चार पोलिस अधिकाऱ्यांसह ५५ पोलिस कर्मचारी कार्यरत असल्याचे पोलिस निरीक्षक गजानन सैदाने यांनी सांगितले. त्यांच्यासोबतच खाजगी सुरक्षा यंत्रणा कार्यान्वीत आहे. नांदेड- मुंबई विमानसेवा सुरू झाल्यास प्रवाशांची संख्या वाढू शकते. नांदेड- दिल्ली- अमृतसर अशी सेवा लवकरच सुरू होणार असल्याचे गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक ठाणसिंग बुंगई यांनी सांगितले. तशा प्रकारे संबंधित विमान कंपनिशी बोलणी झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र सध्या तरी प्रवाशांना वेट अँड वॉचची भूमिका घ्यावी लागणार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​
नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​
सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​
तब्बल 42 वर्षानंतर भारताला सुवर्ण​

Web Title: Nanded news international airport in nanded