esakal | 'निम्न तेरणा' शंभर टक्के भरला, निलंगावासियांची पाच वर्ष चिंता मिटली 
sakal

बोलून बातमी शोधा

nilnga terna.jpg

शेती पाण्याचीही चिंता मिटली  

'निम्न तेरणा' शंभर टक्के भरला, निलंगावासियांची पाच वर्ष चिंता मिटली 

sakal_logo
By
राम काळगे

निलंगा (लातूर) : माकणी (ता.लोहारा) येथील निम्न तेरणा प्रकल्प शंभर टक्के भरल्याने प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांबरोबरच निलंगा शहराची पाच वर्षाची तहान भागणार आहे. शहाराचा पाच वर्षापर्यंत कायमचा प्रश्न मिटणार आहे.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री कै. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रयत्नतून प्रचंड विरोध असातांनाही निम्न तेरणा प्रकल्पाची निर्मिती झाली होती. निम्न तेरणा प्रकल्पातून 'क' दर्जाची नगरपालिका असतानाही निलंगा शहरासाठी पाणीपूरवठा प्रकल्प मंजूर करून घेतला होता. काळी माती व पाइपच्या अडचणीमुळे मोठ्या प्रमाणात गळतीचे प्रमाण होते. सतत गळती लागत असल्याने तत्कालीन मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी लोखंडी पाइप पृष्ठभागावरून टाकण्यात आल्याने सतत लिकेजची समस्या सुटणार आहे. या योजनेत पाणी पुरवठा करण्यासाठी विहीर, चार जलकुंभ, नवीन आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिल्टर, माकणी ते निलंगा 55 किलोमीटर लोखंडी सेन्सर युक्त पाइपलाईन, शहरात 128 कि. मी. अंतर्गत पाइप लाइनचा समावेश आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

शिवाय प्रकल्पाच्या मध्यभागी निलंगा पाणीपूरवठा विहीर असल्याने निलंगा शहरासाठी पाण्याची कमतरता भासत नाही. मागील चार दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे निम्न तेरणा प्रकल्प शंभर टक्के भरला असून सध्या प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्याने शेतकऱ्यांचे खरिप पीकाचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या प्रकल्पात पाणी मुबलक असल्याने निलंग्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरणार असून पुढील पाच वर्षे आता निलंगा शहराला पाणीटंचाई भासणार नाही अशी स्थिती निर्माण होणार आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

निलंगा शहरासाठी पाणीपूरवठा करणारी विहिर मध्यभागी असल्याने प्रकल्पात मृत पाणीसाठा असतानाही शहरासाठी दोन वर्षे पाणी पुरते मात्र आता प्रकल्प शंभर टक्के भरल्याने पुढील पाच वर्षे पाणीटंचाई भासणार नाही. शिवाय या प्रकल्पातील पाण्यामुळे शेती पीकासाठीही मुबलक पाणी मिळणार असून याचा फायदा निलंगा, औसा, उमरगा या तालुक्यातील तेरणा नदीकाठच्या बहूतांष शेतकऱ्यांना होणार आहे. उजव्या व डाव्या कालव्या अंतर्गत पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मिटणार असला तरी या अतिवृष्टीमुळे तेरणा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या शेती पीकाचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासाठी आता शासनाकडून त्वरीत मदत मिळणे गरजेचे आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)