उत्पन्न नाही तर वेतन नाही, कळंब आगारातील अजब प्रकार  

दिलीप गंभीरे
Thursday, 29 October 2020

  • कर्मचाऱ्यांना तीन महिने झाले वेतन नाही.
  • उपासमारीची आली वेळ, हातउसणे घेतलेले पैसे द्यायचे कसे. पडला प्रश्न

कळंब (उस्मानाबाद) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे एसटीच्या कळंब आगाराचे उत्पन्न घटले आहे. उत्पन्न नाही तर वेतन नाही अशी भूमिका एसटीने घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांचे मागील तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
कोरोनाच्या संकटामुळे सर्वच क्षेत्रावर संकट ओढवले आहे. २२ मार्च ला टाळेबंदी करण्यात आली. तेव्हा काही काळासाठी एसटीची सेवा बंद होती. यामुळे तब्बल सहा महिने एसटी कुलूप बंदवस्थेत होती. अनलॉक मधील काळात सेवा पुर्वरत करण्यात आली. त्यामुळे एसटी महामंडळाची वाताहत झाली आहे. मागच्या काही महिन्यांपासून कळंबच्या एसटीची चाके फिरू लागली आहेत. कोरोनाच्या संकट काळातही एसटीचे कर्मचारी रात्रंदिवस सेवारत असून एसटीचे वाहक, चालक आणि यांत्रिकी विभागाच्या कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्याचे वेतन मिळाले नाही. यामुळे कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

वेतन न मिळाल्याने दैनंदिन गाडा कसा चालवायचा याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. हातउसने तसेच व्याजाने पैसे घेऊन गुजराण करण्याची वेळ कर्मचाऱ्यावर ओढवली आहे. परिणामी कर्मचारी कर्जबारी झाले आहेत. सध्याही कोरोनाचा संक्रमण काळ सुरू आहे. याही काळात कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून प्रवाशाना सेवा देत आहेत. मात्र, याच कर्मचाऱ्याना पगारापासून वंचित राहावे लागत आहे. तीन महिन्यापासून त्यांना पगार देण्यात आला नसल्याने एसटी कर्मचाऱ्याचें कुटूंबीय आर्थिक अडचणीत सापडले आहेत. एसटीच्या वरिष्ठ व्यवस्थापनाकडे वेतनाची मागणी केली असता, उत्पन्न नाही त्यामुळे पगार पण नाही अशी भूमिका घेत असल्याचे एसटीच्या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कर्मचारी झाले कर्जबाजारी 
एसटीमध्ये नौकरी असल्याने ती सोडता येईना,सोडली तर दुसरं काय करावं असा मोठा प्रश्न कर्मचारयापुढे उभा ठाकला आहे.वेतन मिळाले नसल्याने प्रापंचिक गरजा कशा भागवाव्यात असा चिंतेचा प्रश्न त्यांच्या कुटूंबियापुढे आहे.त्यामुळे आज उद्या पगारी मिळतील या आशेवर कर्मचाऱ्यांनी व्याजाने तसेच हातुसने पैसे घेऊन अडचणींवर मात केली आहे. त्यामुळे कर्मचारी कर्ज झाले आहेत.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: No income no salary Kalamb depo news