अंबडला ओबीसी आरक्षण बचाव मोर्चा, जातीनिहाय जनगणनेची मागणी

बाबासाहेब गोंटे
Monday, 14 December 2020

ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण अबाधित राहावे. तसेच ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी अंबड येथील तहसील कार्यालयावर सोमवार (ता.१४) सकाळी अकरा वाजता गोलचक्री येथून आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला.

अंबड (जि.जालना) : ओबीसी समाजाला मिळालेले आरक्षण अबाधित राहावे. तसेच ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी अंबड येथील तहसील कार्यालयावर सोमवार (ता.१४) सकाळी अकरा वाजता गोलचक्री येथून आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे बसस्थानक समोरून तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. यावेळी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने दीपाली लांडे, वैष्णवी रहाटगावकर, आदिश्री मोगरे, साक्षी शिंदे, भक्ती अडाणी यांच्या हस्ते नायब तहसीलदार बाबुराव चंडोल यांना मागण्याचे लेखी निवेदन देण्यात आले.

ओबीसी समाजाच्या वतीने शहरातील महात्मा फुले चौकपासून तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात सहभागी असलेल्या हजारो नागरिकांनी विविध मागण्यांचे फलक हातात घेत घोषणा दिल्या. यावेळी ओबीसी समाजाला मिळालेले २७ टक्के आरक्षण आबाधित राहावे. तसेच ओबीसींची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी. महाज्योती संस्थेला सारथीप्रमाणे तात्काळ भरघोस निधी देण्यात यावा आदी मागण्या करण्यात आल्या. मोर्चानंतर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष दीपक बोराडे यांचे भाषण झाले.

यावेळी अर्जुन राऊत, अशोक लांडे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष  नवनाथ वाघमारे, प्रा.सत्संग मुंडे, डॉ.प्रकाश इंगळे, प्रा.भगवानसींग डोभाळ, संतोष जमधडे, विशाल धानुरे, मोईज अन्सारी, बळीराम खटके, गोरख हिरे, सुधाकर घेर, ॲड.लक्ष्मण गायके, आकाश रहाटगावकर, गणेश पाऊलबुद्धे, शुभम जाधव, गंगाधर वराडे, शिवप्रसाद चांगले, महादेव मुळे, भास्कर कोल्हे, मंजित भोजने, डॉ.अभय जाधव, डॉ.पांढरे यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होत्या.

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: OBC Reservation Save Morcha In Ambad Jalna News