Good News : या जिल्ह्यातील हजार बाधितांनी जिंकले कोरोनाचे युद्ध

हरी तुगावकर
Tuesday, 28 July 2020

अऩलॉक सुरु झाल्यापासून रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत चालली आहे. त्यानंतर लॉकडाऊन करूनही ही संख्या कमी होताना दिसत नाही. दररोज सरासरी ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे. सध्या जिल्ह्यात एक हजार ७४७ कोरोना बाधित झाले आहेत. यात सध्या ६३९ जणावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

लातूर : जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत असताना कोरोनावर मात करणाऱयांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. आतापर्यंत एक हजार २७ बाधितांनी कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकले आहे. शासकीय रुग्णालयात योग्य उपचार, प्रतिकारशक्ती आणि इच्छाशक्तीच्या जोरावर या बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाला. लातूर जिल्ह्यात सुरवातीची एक दीड महिना एकही रुग्ण नव्हता. अऩलॉक सुरु झाल्यापासून रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत चालली आहे. त्यानंतर लॉकडाऊन करूनही ही संख्या कमी होताना दिसत नाही. दररोज सरासरी ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे. सध्या जिल्ह्यात एक हजार ७४७ कोरोना बाधित झाले आहेत. यात सध्या ६३९ जणावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर एक हजार २९ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. ठणठणीत होवून ते घरीही गेले आहेत. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

सध्या जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, तसेच उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालयात कोरोनावर योग्य पद्धतीने उपचार केले जात आहेत. तसेच कोविड केअर सेंटरमध्ये देखील उपचारासोबतच त्यांची योग्य काळजी घेतली जात आहे. कोविड केअर सेंटरमध्ये कमी लक्षणे असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. तेथे योग, प्राणायाम, योग्य आहार, आयुर्वेदिक काढा आदी पद्धतीने उपचार केले जात आहेत.

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

योग्य उपचार, प्रतिकार शक्ती आणि इच्छा शक्तीच्या जोरावर या बाधितानी कोरोनावर मात करून घर गाठले आहे. यात लहान मुले, मुली, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरीक अशा सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होणे ही जिल्ह्याच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. 

(Edited by pratap awachar) 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Thousand corona positive is corona free