दरवाढीमुळे रडवतोय कांदा

प्रकाश बनकर
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

  • 50 ते 70 रुपयांपर्यंत किरकोळ बाजारात दर 
  • बाजार समितीत 1 हजार 924 क्विंटल कांद्याची आवक
  • साधारणतः 700 रुपये क्विंटलपासून ते 6 हजार रुपयापर्यंत दर 
  • यापुढील काळात कांदा हा शंभर रुपयांच्या घरात जाणार 

औरंगाबाद : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. चाळण करून ठेवलला कांदा पावसामुळे खराब झाला. तर नवीन कांदा ओलसर असल्यामुळे त्यास दर कमी मिळत आहे; मात्र दर्जेदार कांद्याला बाजारात क्विंटलामागे सहा हजार रुपयांचा दर मिळत आहे. यंदा कांद्याची आवक कमी असल्यामुळे किमती वाढू लागल्या आहेत. किरकोळ बाजारात कांदा हा किलोमागे 70 रुपयांपर्यंत विक्री होत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याची आवक घटली आहे. गेल्या पाच दिवसांत बाजार समितीत 1 हजार 924 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे. या काद्यांला त्यांच्या दर्जानुसार दर मिळत आहे. साधारणतः 700 रुपये क्विंटलपासून ते 6 हजार रुपयापर्यंत दर कांद्याला मिळत आहे.

हेही वाचा : सत्तासंर्घषाच्या पार्श्‍वभुमीवर राज्यात बंदोबस्त वाढवला

दर्जेदार कांद्याने सत्तरी गाठली

सोमवारी (ता. 25) बाजार समितीत 591 क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यातील चांगल्या कांद्याला उच्चांकी 6 हजार रुपयांचा दर मिळाला. ठोक बाजारात वाढलेला दर हा किरकोळ बाजारात विक्री होणाऱ्यांवर जाणवत आहे. किरकोळ बाजारात साधारण कांदा 40 रुपये किलोने विक्री होत आहे. तर दर्जेदार कांद्याने सत्तरी गाठली आहे. यापुढील काळात कांदा हा शंभर रुपयांच्या घरात जाणार असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. 

हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली अन या गावात झाली मारामारी

बाहेरराज्यांतून कांदा मागावा लागणार
औरंगाबादेत विक्रीसाठी येणारा कांदा हा नाशिक, लासलगाव, बोरसर, वैजापूर, कन्नड यासह विविध तालुक्‍यांतून येत असतो. यंदा परतीच्या पावसामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. पुढील काही महिन्यांत बाहेरराज्यांतून कांदा मागावा लागणार असल्याची शक्‍यताही विक्रेत्यांनी वर्तविली. 

उघडून तर पाहा - औरंगाबाद : रुग्णांना घरपोच मोफत रिक्षा, या क्रमांकावर करा काॅल

गेल्या वर्षी आवक होती पण भाव नव्हता 

गेल्या वर्षी कांदाचे उत्पादन चांगले झाले होते. मात्र दर नसल्यामूळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणी आला होता. यामूळे राज्य शासनाला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिक्‍विंटल दोनशे रुपयांचे अनुदान घोषित करावे लागले होते. या आनुदानामूळे शेतकऱ्यांना काहीसा दिलास मिळाला होता. हे आनुदान कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर जमा करण्यात आले होते. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतला होता. 

तारीख-------- आवक ---------- दर 
21 नोव्हेंबर------ 789----------1200 ते 5000 रुपये 
23 नोव्हेंबर------744----------1200 ते 5500 रुपये 
25 नोव्हेंबर-------591---------- 700 ते 6000 रुपये 

 

बाजार समितीत नवीन काद्यांची आवक सुरु झाली आहे. इतर बाजार समितीच्या तुलनेत औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीत रोज 500 क्‍विंटलपर्यंत कांद्याची आवक होत आहे. यंदा काद्यांला सातेश ते सहा हजार रुपयांपर्यंत विक्रमी दर मिळत आहे. मात्र हा दर काद्यांच्या दर्जानुसार मिळत आहेत. यांची आवक सध्या चांगली असली तरी पुढील काही महिन्यात यांची आवक कमी होण्याची शक्‍यता आहे. 
- राधाकिसन पठाडे, सभापती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion rate is hiking in Aurangabad