मृत्यूनंतरही मोगरग्याचे रिक्षाचालक पाच जणात राहणार जीवंत

हरी तुगावकर 
Tuesday, 24 November 2020

'मरावे परी किर्ती रुपे उरावे'  अशी म्हण आहे. हीच म्हण औसा तालूक्यातील मोगरगा गावातील राजेश रुब्दे यांच्याबद्दल घडली आहे. नाशिक हायवेवर रिक्षाचालक राजेश (वय३८) यांचा अपघात झाला. यात त्यांचे ब्रेनडेड झाले. घरातला कर्ता पुरूष गेला. याचे दु:ख सर्वांनाच असताना. मात्र, या दु:खाच्या प्रसंगातही कुटुंबियांनी राजेश यांचे देहदान केले. राजेश यांच्या शरीरातील काही अवयवांमुळे पाच जणांना जीवदान मिळणार आहे.  
 

लातूर : मोगरगा (ता. औसा) येथील एका रिक्षा चालकाचा पुणे नाशिक हायवेवर अपघात झाला होता. यात त्यांचे ब्रेनडेड झाले. त्यांच्या नातेवाइकांनी पुढाकार घेत त्यांचे पुण्यात अवयवदान केल्याने पाचजणांना जीवदान मिळण्यास मदत झाली आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

मोगरगा (ता. औसा) येथील राजेश माणिकराव रुब्दे (वय ३८) यांचा (ता. १७) नोव्हेंबर रोजी पुणे नाशिक हायवेवर अपघात झाला होता. यात ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना पुण्याच्या डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना (ता. १९) नोव्हेंबरला उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी रुब्दे यांचे ब्रेनडेड झाल्याचे त्यांच्या नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर त्यांच्या नातेवाइकांची संमती घेऊन रुब्दे यांचे अवयवदान करण्यात आले आहे. पुणे प्रादेशिक प्रत्यारोपण समन्वय समितीच्या आरती गोखले यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली. यात त्यांचे हृदय, मूत्रपिंड, स्वादुपिंड व यकृत असे अवयव दान केले गेल्याने पाचजणांना जीवदान मिळाले आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

रुब्दे यांच्या नातेवाइकांनी धाडसी निर्णय घेतल्याबद्दल महाराष्ट्र ऑटोरिक्षा चालक सेनेचे लातूर जिल्हा अध्यक्ष तथा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच अशासकीय सदस्य त्र्यंबक स्वामी यांनी स्वागत केले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

 

राजेश रुब्दे हे पुण्यात कार्यरत होते. माझ्या मतदारसंघातील ते असल्याने सतत संपर्कात होते. लॉकडाउनच्या काळातही ते संपर्कात होते. एका अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचे ब्रेनडेड झाले होते. त्यांच्या नातेवाइकांची संमती घेऊन अवयवदान करण्यात आले. यामुळे अवयवदानाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. 
- अभिमन्यू पवार, आमदार, औसा 

(Edited By Pratap Awachar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Organ donation rickshaw driver Rajesh from Mogarga saving lives five people