Corona Test : उस्मानाबादेत कोरोना चाचणीला वेग; चारशे जणांची रोज तपासणी   

corona.jpg
corona.jpg

उस्मानाबाद : इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या नियमानुसार कोरोना चाचण्यांची संख्या वाढविली आहे. कंटेनमेंट झोन आणि हॉटस्पॉटमध्ये इंफ्लुएंजासारखी लक्षणे आढळल्यास अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्येही एक ऑगस्टपासुन या टेस्ट किट उपलब्ध झाल्या आहेत. तीस हजार टेस्ट किट सध्या जिल्ह्याला मिळाल्या आहेत. दोन हजार ३३६ इतक्या टेस्ट देखील करण्यात आल्या आहेत. दिवसाला साधारण चारशेच्या दरम्यान या टेस्ट करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.  

सध्याच्या स्थितीला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्याही टेस्ट करणे आवश्यक होऊ लागले आहे. आरटीपीसीआर टेस्टला उशीर लागत असल्याने अगदी कमी वेळामध्ये रुग्णांची टेस्ट करण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्टचा उपयोग होतो. त्या व्यक्तीला या अगोदर कधी कोरोना झाला आहे का नाही, याचीसुध्दा माहिती या अँटीजेन टेस्टमधून मिळत असल्याने त्याचा जास्त फायदा होणार आहे.

सध्या सर्वच कार्यालये सूरु झालेली आहेत. या शिवाय दैनंदिन व्यवहार देखील सूरु असल्याने पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कातील संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. अशा वेळी सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयात तसेच ऑफिस व खाजगी क्षेत्रामध्ये अँटीजेन टेस्ट करण्याचा सल्ला दिला जात आहे.

या चाचणीमुळे कर्मचारी, लोकांच्या मनातील भीती दूर होणार आहे. लक्षणे नसलेल्या व्यक्तींची तसेच बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना तातडीने आपण संक्रमित आहोत की नाही याची माहिती मिळणार आहे. आयसीएमआरनुसार अँटीजन टेस्ट किटद्वारे ऑन द स्पॉट चाचणी केली जाऊ शकते. तीस मिनीटांत त्याचा अहवाल मिळणार आहे.

कोरोना संशयिताची अँटीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्याची पुन्हा आरटी-पीसीआर टेस्ट केली जाणार आहे. जिल्ह्याचा विचार करता दिवसाकाठी चारशेच्या दरम्यान टेस्ट केल्या जाणार आहेत. तीस हजार टेस्ट किट उपलब्ध झाल्याने मोठी गैरसोय थांबणार आहे.

Edit-Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com